रामणबाण काढ्यासाठी मसाला पदार्थ, हळदीची मागणी वाढली...दर ही वधारले !  

रामणबाण काढ्यासाठी मसाला पदार्थ, हळदीची मागणी वाढली...दर ही वधारले !  

शनिमांडळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांची खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. विशेषतः काढ्यासाठी हळद, दालचिनी, लवंग, काळीमिरी, सुंठ या पदार्थांच्‍या मागणीत वाढ झाली आहे. काही महिन्यात किराणा घेणाऱ्या ग्राहकांच्या सामानामध्ये यांचा समावेश आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहावी, यासाठी सर्वाधिक वापर हळदीचा केला जात आहे. रात्री झोपताना तसेच सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात हळद टाकून पिल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हळदीला मागणी वाढली आहे. रात्री झोपताना दुधात हळद टाकून प्याल्यानेही रोगप्रतिकार शक्ती वाढते. आयुष मंत्रालयाने काढ्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे हळद, दालचिनी, काळीमिरी, लवंगला मागणी वाढली आहे. तुळशीची पाने काढ्यात टाकल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. 

हळद गुणकारी 
दुधात हळद टाकून पिल्यास जखम लवकर भरून येते. शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्याने आजार लवकर बरा होण्यास मदत मिळते. हळद घातलेले दूध किंवा हळदीचे दूध अनेक आरोग्यकारी गुणांनी युक्त आहे हळदीमध्ये असलेल्या अँटी बायोटिक प्रॉपर्टीज आणि दुधामध्ये असलेले कॅल्शिअम यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी पासून संरक्षण मिळते. कोरोनाच्या पर्शवभूमीवर मसाल्याच्या पदार्थांची उलाढाल दिवसाला दीड ते दोन क्विंटलने वाढली आहे. एरवी मसाल्याच्या पदार्थांना हिवाळ्यातच जास्त मागणी असायची, परंतु आता मसाल्याच्या पदार्थांची उलाढाल मार्केटमध्ये मोठ्या फरकाने वाढली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्‍हणणे आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून आमच्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या किराणा सामानाचे यादीत हळद, लवंग, काळीमीरी या पदार्थांचा समावेश आहे. तसेच मागणी वाढल्याने सुंठ्याच्या दरातही वाढ झाली आहे. 
-राकेश मोरे, किराणा व्यापारी 

अशी झाली भाववाढ 
पदार्थ आधीचे दर आताचे दर (प्रतिकिलो) 
हळद ११०रु १३० 
काळी मिरी ६८० ७०० 
दालचिनी ४९० ५०० 
लवंग ७३५ ७५० 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com