शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या सभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले.

नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले.

शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जून टिळे, नगरसेवक गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक आदी उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, नवाब मलिक आदी सभेसाठी उपस्थित राहतील. भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे "हल्लाबोल यात्रा' राज्यभर सुरु आहे.

तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात सभा झाल्यात. उत्तर महाराष्ट्रातील यात्रेची सांगतानिमित्त नाशिकमध्ये सभा होत आहे. दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड्‌. रवींद्र पगार यांनी हल्लाबोल सभेच्या तयारीसाठी तालुकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तालुकानिहाय बैठकी घेण्याची जबाबदारी निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे. तालुकानिहाय निरीक्षकांची नावे अशी ः नाशिक- उत्तम सहाने, त्र्यंबकेश्वर-नितीन मोहिते, इगतपुरी-सोमनाथ बोराडे, सिन्नर-नामदेव वाघचौरे, दिंडोरी-जगदीश पवार, निफाड-राजेंद्र जाधव, कळवण-योगेश गोसावी, चांदवड-विजय पवार, येवला-नंदकुमार कदम, नांदगाव-राधाकिसन सोनवणे, देवळा-उत्तम आहेर, सटाणा-विजय दशपुत्रे, मालेगाव-सुनील कबाडे, सुरगाणा-आबासाहेब देशमुख, पेठ-सुनील पेलमहाले व नारायण पाटील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sharad pawar sabha