
लाॅकरचा दरवाजा उघडताच त्यांना आत पिशवी आढळली. ती उघडून पाहिली असता, सुमारे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवलेले आढळले.
शिरपूर : येथील दि शिरपूर मर्चंट बँकेतील लॉकर बंद केल्यानंतर ग्राहक लाॅकरमध्येच सोने विसरून गेले. दुसरे ग्राहक जेव्हा याच लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी गेले तर त्यांना विसरून गेलेले सोन्याची पिशवी दिसली. आणि प्रामाणिपणे त्यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधिताला परत केले.
वाचा- एसटीचा पॅकेज टूर..दोन दिवस फिरा शनिशिंगणापूर, वेरूळलेणी अन् भद्रामारोती
.
शिरपुर येथील पांडू बापू माळी विद्यालयाचे निवृत्त शिक्षक पी. डी. पाटील यांनी त्यांच्याकडील दागिने ठेवण्यासाठी मर्चंट बँकेचे लॉकर भाडेतत्त्वावर घेतले. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लॉकर बंद करून बँकेला परत केले. बँकेचे कर्मचारी हेमेंद्र कन्हय्यालाल शहा यांच्या पुतण्याकडे विवाह असल्याने त्यांना सहकुटुंब जावयाचे होते. घरातील दागिने ठेवण्यासाठी त्यांनी बँकेत फॉर्म भरून लॉकर घेतले.
आणि पिशवी आढळली
शहा यांनी दागिने ठेवण्यासाठी लाॅकरचा दरवाजा उघडताच त्यांना आत पिशवी आढळली. ती उघडून पाहिली असता, सुमारे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवलेले आढळले. श्री. शहा यांनी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संजय कुलकर्णी, अधिकारी दिलीप कापडी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
आवश्य वाचा- गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !
शोध सुरू झाला मुळ मालकाचा
बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित लॉकर क्रमांक यापूर्वी कोणाच्या नावावर होता ते शोधले. पी. डी. पाटील यांच्याशी संपर्क साधून खात्री केल्यानंतर त्यांना बँकेत बोलावून घेतले. व त्यांना दागिने परत देण्यात आले.
प्रामिणीकपणाचा सत्कार
प्रामाणिकपणा दाखवून बँकेची प्रतिमा जपल्याबद्दल बँकेचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते हेमेंद्र शहा, संजय कुलकर्णी, दिलीप कापडी, श्रीमती रत्ना चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन, उपाध्यक्ष काशीनाथ माळी, संचालक नवनीत राखेचा, किरण दलाल, मनोज अग्रवाल, विनोद चावडा़, रामचंद्र ठाकरे, केवलसिंग राजपूत, श्रीमती स्मिता कोठारी, श्रीमती पूनम कोठारी व बँक अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूका रंगात; चौकाचौकांमध्ये लागलेले पोस्टर्सने वातावरण तापले
७५ वर्षांपासून मर्चंट बँक सभासद व खातेदारांच्या विश्वासावर उभी आहे. बँकेकडून नेहमीच ग्राहकहित जपण्यास प्राधान्य दिले जाते. बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणखी वृद्धिंगत होणार आहे.
-प्रसन्न जैन, अध्यक्ष
संपादन- भूषण श्रीखंडे