esakal | धंदा करने का; तो दो हजार देनेका क्‍या...असे म्‍हटले अन्‌ घडली अद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

marhan

तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी तंबी दोघांनी दिली. तुम्हाला पैसे का देऊ अशी विचारणा माळी यांनी केली. त्याचा राग आल्याने दोघांनी त्यांना दुचाकीवरून खाली खेचले. कॉलर धरून शिवीगाळ करीत डोळ्यावर व डाव्या कानाखाली मारहाण केली.

धंदा करने का; तो दो हजार देनेका क्‍या...असे म्‍हटले अन्‌ घडली अद्दल

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : 'हा आमचा एरिया आहे, इथे धंदा करायचा असेल तर दरमहा दोन हजारांचा हप्ता द्यावा लागेल' अशी मागणी दोन युवकांनी पानटपरी चालकाला करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. शहरातील दोघा उगवत्या भाईंविरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दिलीप भगवान माळी (३९, रा.हुलेसिंह नगर, शिरपूर) यांची करवंद नाका परिसरात पानटपरी आहे. तिथे व्यवसाय करण्यासाठी संशयित चोपड्या तथा महेश श्रावण माळी व मुन्ना माळी (दोघे रा.शिरपूर) त्यांच्याकडे दरमहा खंडणी मागत होते. १० सप्टेंबरला रात्री साडेआठला संशयितांनी माळी यांची दुचाकी अडवली. आमच्या एरियात धंदा करायचा असेल तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी तंबी दोघांनी दिली. तुम्हाला पैसे का देऊ अशी विचारणा माळी यांनी केली. त्याचा राग आल्याने दोघांनी त्यांना दुचाकीवरून खाली खेचले. कॉलर धरून शिवीगाळ करीत डोळ्यावर व डाव्या कानाखाली मारहाण केली. लोखंडी पाईपने त्यांच्या पाठीवर ठोसे लगावले. या मारहाणीत दिलीप माळी गंभीर जखमी झाले. त्यांनी वैद्यकीय उपचार करून घेतल्यानंतर १४ सप्टेंबरला शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार जे.एम.पाटील तपास करीत आहेत. 

नवनवीन टोळ्या होताय सक्रीय
करवंद नाका शहरातील सर्वाधिक गजबजलेला व्यावसायिक परिसर असून तेथे दुकानदारांना उपद्रव देणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यापूर्वीही माल किंवा खाद्यपदार्थ घेतल्यानंतर बिल न देणे, प्रसंगी मारहाण करणे, व्हिडीओ शूटिंग काढून त्रास देणे असे प्रकार घडले. मात्र तक्रार देण्यास संबंधित टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आहे. आधीच लॉकडाउनंतर व्यवसाय मंदावल्याने त्रस्त असलेल्या व्यावसायिकांसमोर खंडणीखोरांचे संकट उभे असून पोलिसांनी संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे