esakal | वडिलांच्या डोळ्यात होते मुलीचे वेगळे स्‍वप्न...मात्र त्‍यांच्या जाण्याचे दुःख तिच्याच डोळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

daughter Funeral

आपले आयुष्‍य उभे करण्यासाठी फिरणाऱ्या पित्‍याच्या निधनाचे दुःख डोळ्यात होते. पित्‍याच्या अंत्यविधीची तयारी झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागात अंत्यसंस्कार मुलाकडूनच केले जातात. मुलगा नसेल, तर पुतण्या किंवा भाऊ अंत्यविधी करतो.

वडिलांच्या डोळ्यात होते मुलीचे वेगळे स्‍वप्न...मात्र त्‍यांच्या जाण्याचे दुःख तिच्याच डोळ्यात

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : काही दिवसांपूर्वी हौसेने वरसंशोधनात गुंतलेल्या वडिलांचा अंत्यविधी पार पाडताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मात्र, कर्तव्यपूर्तीसाठी ती स्वतःला सावरून उभी राहिली. वडिलांचा अंत्यसंस्कारही तिने निर्धाराने पार पाडला. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवणाऱ्या आप्तस्वकीयांनीही तिचा आत्मविश्‍वास पाहून बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 
बाभुळदे (ता. शिरपूर) येथील प्रमोद महाजन नोकरीनिमित्त कल्याणला स्थायिक होते. त्यांना रश्‍मी ही एकुलती एक मुलगी. मुलीचे लग्‍नाचे वय झाल्याने तिच्यासाठी प्रमोद महाजन हे वरसंशोधनात गुंतले होते. फिरण्यात आल्‍याने काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले. यात न्यूमोनियाचे निदान झाले. उपचार सुरू झाले. त्यांच्या देखभालीत असतानाच पत्नीही आजारी पडली. त्यामुळे उपचारांची हेळसांड होऊ नये या हेतूने त्यांच्या नातेवाईक तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सरोज पाटील यांनी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. 

उपचाराला प्रतिसाद पण...
प्रमोद महाजन यांना उपचारांना प्रतिसाद मिळत असल्‍याने प्रकृतीत सुधारणा होवू लागली होती. मात्र अचानक प्रकृती पुन्हा बिघडली व २८ जुलैला त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी करून घेतलेली कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली. यामुळे रितीरिवाजाप्रमाणे अंत्‍यविधी करण्याचे ठरविण्यात आले.

अन्‌ ती राहिली उभी
आपले आयुष्‍य उभे करण्यासाठी फिरणाऱ्या पित्‍याच्या निधनाचे दुःख डोळ्यात होते. पित्‍याच्या अंत्यविधीची तयारी झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागात अंत्यसंस्कार मुलाकडूनच केले जातात. मुलगा नसेल, तर पुतण्या किंवा भाऊ अंत्यविधी करतो. मात्र, डॉ. सरोज पाटील यांनी अंत्यविधी रश्‍मीच्या हस्ते होईल, अशी भूमिका घेतली. तिला समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे रश्‍मीने अंत्ययात्रेत खांदा देण्यापासून चितेला अग्नी देण्यापर्यंतची आणि नंतरच्या विधींचे सोपस्कारही पार पाडले. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image