
शिरपूर (धुळे) : अडीच महिन्यांपूर्वी थाटामाटात मुलाचा विवाह करणारे राजेंद्र देसले आत्महत्या (Suicide case) करतील याचा विचारही कोणी केला नव्हता. मनमिळाऊ व हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या राजेंद्र देसले आणि त्यांची मुलगी ज्ञानल यांचे मृतदेह बाहेर काढताना नातलगांच्या काळजात चर्र झाले. काही वेळाने वंदना देसले यांचाही मृतदेह (Deadbady) काठाला लागला आणि तापी काठावर हजर प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटला. (BJP worker Rajendra Desale from Dhule district committed suicide with his family)
भोद (ता. धरणगाव) येथील प्रगतीशील शेतकरी तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष व एरंडोल- धरणगाव शेतकी संघाचे चेअरमन राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी वंदना, मुलगी ज्ञानल यांच्यासह १७ मेस सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून नदीत उडी घेतली होती. तिघांचे मृतदेह बुधवारी (ता.१८) सकाळी हाती लागले. मृत पाटील यांचा पुतण्या सौरभ देसले आणि व्याही राजेंद्र पाटील मृतदेह घेण्यासाठी उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी अखेरची गाठभेट झालेल्या जिवलगांचे मृतदेह पाहून दोघांनाही अश्रू अनावर झाले.
उत्तरकार्य आटोपून निघाला परिवार
राजेंद्र देसले यांची बहीण लताबाई झाल्टे हिच्या सासऱ्यांचे १७ मेस उत्तरकार्य होते. त्यासाठी राजेंद्र देसले कुटुंबासह येळावे (ता. अमळनेर) येथे उपस्थित होते. तेथून एकुरती (ता. अमळनेर) येथे नातलगांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते न पोहोचल्याने शोधाशोध सुरू झाली. देसले यांचा मोबाईलही बंद होता. परिसरात त्यांचा तपास न लागल्याने नातलग शोध मोहिमेसाठी लागले. अखेर तापी नदीवरील पुलावर दभाशी (ता. शिंदखेडा) येथे त्यांची इंडिका कार उभी असल्याची माहिती मिळाल्याने सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.
काटेरी झुडपात मृतदेह
१८ मेस सकाळपासून त्यांचा शोध सुरू होता. शिरपूर शहर, नरडाणा व थाळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी ठाण मांडून होते. सावळदे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यानी शोध सुरू ठेवला. बुधवारी सकाळी आठला सावळदे येथील नदीकाठावरील बाभळीच्या झुडुपात अडकलेले राजेंद्र व ज्ञानल यांचे मृतदेह आढळले. तेथून काही अंतरावर वंदना पाटील यांचाही मृतदेह आढळला. तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
कर्जबाजारीपणामुळे निर्णय?
राजेंद्र देसले यांचा पुतण्या सौरभ देसले याने दिलेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारीला राजेंद्र देसले यांनी मुलगा तेजस याचा विवाह त्यांचे परममित्र तथा नूतन मराठा विद्यालयातील शिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मुलीशी करून दिला होता. मात्र कोरडवाहू शेतीतील नापिकीमुळे कर्ज फेडता न आल्याने ते अस्वस्थ होते. ते इतक्या टोकाचा निर्णय घेतील असा विचारही कोणी केला नव्हता. त्यांच्या पत्नी वंदना देसले या भोद ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. त्यांचे माहेर भरवस (ता. अमळनेर) येथील आहे. मुलगी ज्ञानल धरणगाव महाविद्यालयात बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिकत होती. मुलगा तेजस शेतकी संघात नोकरीला आहे. देसले यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
आत्महत्येचा विचार
मृत देसले यांच्या इंडिका कारमध्ये डेलीगेट या मक्यावर फवारण्याच्या किटकनाशकाची बाटलीही आढळली. मात्र ती सीलबंद आहे. त्यामुळे देसले कुटुंब घरूनच आत्महत्येच्या विचाराने निघाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी थाळनेर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे, सावळदे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन राजपूत यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.