सक्तीच्या भूसंपादनामुळे पाच ऐवजी चौपट मोबदला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नाशिक ः नानाविध प्रयत्न करुनही नागपूर समृध्दी महामार्गासाठी प्रतिसाद मिळत नसलेल्या सुमारे 358 हेक्‍टर जमीनीचे सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. तशी अधिसूचना शासनाने प्रसिध्द केली आहे. त्यामुळे लॅण्ड पुलिंग, जमीन खरेदी नंतर हा विषय आता सक्तीच्या भूसंपादनापर्यत आला आहे. सक्तीने संपादन प्रक्रियेपूर्वी काही प्रतिसादाची प्रशासनाला अपेक्षा आहे. 

राज्यातील 10 जिल्हे, 24 तालुके आणि 391 गावांना जोडणाऱ्या नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्‍यातील 46 गावातील 1265 हेक्‍टर जमीन लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हा महामार्ग विकसित करणार असून या मार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास 16 तासांवरून 8 तासांवर येऊ शकणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्याचे मोठे भाग थेट आतंरराष्ट्रीय आयात निर्यातीचे केंद्र असणाऱ्या मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) जोडले जाणार आहेत. गेल्या वर्षापासून प्राधान्यक्रमाने सुरु असलेल्या या विषयात भूसंपादन हा कळीचा मुद्दा ठरला होता. 

सक्तीने भूसंपादन 
प्रकल्पांसाठी सुरवातीला जमीन मालकांना भागीदारीत सहभाग देण्यासाठीचा "लॅण्ड पुलिंग' जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला गेला. पण त्यापोटीचा मोबदला परवडणारा नसल्याने त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट खरेदीर्तंगत जमीनी खरेदी झाल्या. एकंदर 1265 हेक्‍टर जमीन 1108 हेक्‍टर जमीन खासगी आहे. त्यातील सुमारे 750 हेक्‍टर जमीन खरेदी झाली असून 358 हेक्‍टरच्या आसपास जमीनीची खरेदी बाकी आहे. संबधित शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने आता शासनाने अधिसूचना काढून सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली आहे. 

जिल्ह्यातील स्थिती 
तालुके ः 2 तालुके, गाव ः 46 
आवश्‍यक जमीन ः 1265 हेक्‍टर 
खासगी जमीन ः 1108 हेक्‍टर 
सरकारी जमीन ः 157 हेक्‍टर 
जमीन खरेदी ः 749 हेक्‍टर 
भूसंपादन बाकी ः सुमारे 358 

Web Title: marathi news smrudhi bhusampadan