esakal | बालाजी रथ कोसळला म्‍हणून बारा वर्षाचा होता खंड; आता पुन्हा रथयात्रा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

songir balaji rath

सन १९७८ मध्ये रथघरापासून रथयात्रा सुरू होऊन अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मोगऱ्या देण्याच्या रथ कोसळून त्यात मोगऱ्या लावणारे दोन जण ठार व एक जण जबर जखमी झाले होते. १९७८ ते १९९० पर्यंत बारा वर्षे रथयात्रा खंडीत झाली होती.

बालाजी रथ कोसळला म्‍हणून बारा वर्षाचा होता खंड; आता पुन्हा रथयात्रा रद्द

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगिर (धुळे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रथोत्सवानिमित्त वहन मिरवणूक व आश्विन शुध्द एकादशीला साजरा होणारी व १६५ व्या वर्षांत पदार्पण करणारी येथील भगवान बालाजींची रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी फक्त पूजा व आरती करण्यात येणार असल्याची माहिती बालाजी मंदिराचे पुजारी मुकुंद भंडारी यांनी दिली. 

शासनाने गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही असे जाहीर केले आहे. रथयात्रेला मोठी गर्दी असते. त्यानिमित्त यात्रा ही भरते. यात्रेत कोट्यावधीची उलाढाल होते. यंदा ती उलाढाल ठप्प होणार असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. 

घटनस्‍थापनेपासून होते सुरवात
जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. यापार्श्वभुमीवर यंदा सर्वच धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे रथयात्रेला होणारी गर्दी पहाता कोरोना पसरण्याची भिती अनाठायी नाही. दरम्यान घटस्थापनेपासून दररोज वहन यात्रा निघते. गावातील काही समाज प्रत्येकी एका दिवसाचा वहन यात्रेचा खर्च करतात. यंदा वहन यात्रेऐवजी फक्त त्या- त्या समाजातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भगवान बालाजींची पूजा व आरती होईल. तसेच रथयात्रेच्या दिवशी बालाजी मंदिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास भगवान बालाजींची आरती व पूजा होऊन रथाचीदेखील पूजा होईल.

यापुर्वी बारा वर्षांचा होता खंड
येथे सन १९७८ मध्ये रथघरापासून रथयात्रा सुरू होऊन अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मोगऱ्या देण्याच्या रथ कोसळून त्यात मोगऱ्या लावणारे दोन जण ठार व एक जण जबर जखमी झाले होते. १९७८ ते १९९० पर्यंत बारा वर्षे रथयात्रा खंडीत झाली होती. १९९१ मध्ये पुन्हा सुरू झाली; तेव्हापासून आजपर्यंत रथोत्सवाची वैभवशाली परंपरा सुरू आहे. बारा वर्षाच्या खंडीत रथयात्रेदरम्यान वाहनावर बालाजी मुर्ती ठेऊन गावातून मिरवण्यात आले होते. यंदा तेवढीही परवानगी नाही. हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतिक रथयात्रा गावचे अभिमान असून यात्रेला बाहेरगावी राहणारी मंडळी येते. यंदा कोरोनामुळे बाहेरील बहूतांश मंडळी कायमस्वरूपी येथेच आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image