esakal | मन सुन्न करणारी घटना; सरळ जाण्याचा निर्णय घेतला अन्‌ 
sakal

बोलून बातमी शोधा

river death

बुरझड ते अमळनेर दररोज मोटारसायकलने (एमएच १५, सीयू, १५७९) अपडाऊन करायचा. पांझरेचे पाणी पुलावरून जात असल्याने तो वालखेडा बेटावद असा फिरून जात होता. आज सकाळी साडेआठच्या सुमारास घरून जेवणाचा डबा घेऊन तो ड्युटीवर जात असताना

मन सुन्न करणारी घटना; सरळ जाण्याचा निर्णय घेतला अन्‌ 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : शिंदखेडा व अमळनेर तालुक्याला जोडणारा वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील पांझरा नदीवरील धोकेदायक पुल मोटारसायकलने ओलांडताना एक युवक वाहून मयत झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी (ता. २४) साडेनऊच्या सुमारास घडली. दीपक नाना पारधी (वय २५, राहणार बुरझड ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. 

पुलावरून पांझरेचे पाणी जात असल्याने त्याखाली तुटलेला पुल लक्षात न आल्याने मोटारसायकलचे चाक खड्ड्यात गेले. त्यामुळे तोल जाऊन दीपक मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. वालखेडा येथील युवकांनी त्याला व मोटारसायकलला बाहेर काढले; परंतु तोपर्यंत दीपक मयत झाला होता. दीपक हा देवळी (ता. अमळनेर) येथे वीज वितरण कंपनीच्या आउटसोर्सिंग डिपार्टमेंटमध्ये टेंपररी बेसिसवर बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ म्हणून कामास होता. 

रोज पुल टाळून जायचा
बुरझड ते अमळनेर दररोज मोटारसायकलने (एमएच १५, सीयू, १५७९) अपडाऊन करायचा. पांझरेचे पाणी पुलावरून जात असल्याने तो वालखेडा बेटावद असा फिरून जात होता. आज सकाळी साडेआठच्या सुमारास घरून जेवणाचा डबा घेऊन तो ड्युटीवर जात असताना वालखेडा जवळील पांझरा पुलावर कमी पाणी वाहत असल्याचे पाहून त्याने बेटावदमार्गे फिरून न जाता पुलावरून मोटारसायकल नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून पाणी जात असल्याने पुलाचा तुटलेला भाग न दिसल्याने मोटारसायकल खड्ड्यात जाऊन तो पुलाखाली पडला आणि मोटारसायकलसह वाहत जाऊन पुलापासून तीनशे मीटर अंतरावर अडकला. वालखेड्यातील युवकांनी त्याला बाहेर काढले. घटना मारवड पोलीस ठाणे अंतर्गत असल्याने त्याला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

जन्माला येण्यापुर्वीच बाळ पोरके
घरात सर्वात मोठा व एकमेव कमावता दीपकचे ८ डिसेंबर २०१९ मध्ये लग्न मेथी (ता. शिंदखेडा) येथील सपना पारधी हिच्याशी झाले होते. लवकरच बाळ जन्माला येणार म्हणून अवघे कुटुंब आनंदी होते. मात्र बाळाला पहाण्यापुर्वीच दीपकचे निधन झाल्याने बाळ जन्मापुर्वीच पोरके झाले. दीपकचे आई भारतीबाई व वडील नाना शेंपा पारधी शेतकरी असून सीझनमध्ये वणी गडावर पुजेचे साहित्य विक्रीचे छोटे दुकान चालवतात. कोरोनामुळे सध्या दुकान बंद आहे. लहान भाऊ भूषण (एसवायबीए) व बहीण चंद्रकला (एफवाय बीए) शिकत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे