मोबदल्यासाठी खासदार, आमदार सरसावले !

एल. बी. चौधरी
Tuesday, 15 December 2020

शेतीचा मोबदला न मिळाल्याने व दोन वर्षे कोणतेही पीक घेता न आल्याने सोंडले शिवारातील हवालदिल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेकदा चकरा मारल्या, पण फक्त आश्वासन मिळाले. 

सोनगीर : जामफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या असून, अद्यापही त्यांना मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांती भूसंपादनापोटी मोबदला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकामी खासदार, आमदारांनीही पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. 

आवश्य वाचा- धुळ्यात ‘कोरोना’च्या लसीकरणासाठी धर्मगुरूंची मदत -

तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ प्रकल्प भरण्याच्या योजनेचे काम गतिमान आहे. त्यासाठी जामफळलगतच्या सुमारे ४८८ शेतकऱ्यांची १,२०० एकर शेती संपादित झाली आहे. पैकी सोनगीर शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. मात्र, सोंडले शिवारातील शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून शेतीचा मोबदला न मिळाल्याने व दोन वर्षे कोणतेही पीक घेता न आल्याने सोंडले शिवारातील हवालदिल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेकदा चकरा मारल्या, पण फक्त आश्वासन मिळाले. 

श्रेयाच्या राजकारणाची चर्चा 
दरम्यान, भाजपला मानणाऱ्या काही शेतकऱ्यांनी भाजपचे जिल्हा नेते प्रा. अरविंद जाधव यांची भेट घेतली. त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी (ता. ४) बैठक घेतली. यात २६९ कोटींचा निधी प्राप्त झाल्याने एका महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले. मात्र, शेतजमिनीला काय भाव मिळेल, हे जाहीर झाले नाही. 

वाचा- संमतिपत्र देऊनही निम्मे विद्यार्थी गैरहजर 

दरम्यान, काँग्रेसला मानणाऱ्या काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन पुरेसा मोबदला मिळण्याबाबत चर्चा केली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी जिल्हाधिकारी यादव यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळावा, अशी मागणी केली. बाजारभावाच्या चारपट मोबदला न मिळाल्यास एक इंच शेती देणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songire MPs and MLAs took initiative to compensate for Jamphal dam