मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक थेट पोहचले शेतात !

एल. बी. चौधरी
Monday, 12 October 2020

मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंबे येथील शेतकऱ्यांच्या शेतात कायमस्वरूपी कामासाठी आले आहेत. त्यांच्या मुलांनी येथील विविध शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेपासून त्यांची कुटुंबे तीन ते चार किलोमीटर अंतरावर शेतातील झोपडीत राहतात.

सोनगीर : शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत राज्यभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरू असले तरी ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. हातावर पोट असणारे पालक आपल्या मुलांना मोबाईल घेऊ शकत नाही. त्यापैकी काही पालक थेट शेतात राहून जागल्याचे काम करतात. त्यांचेकडे कुठून आले इंटरनेट सेवा. अशा काही विद्यार्थ्यांच्या थेट शेतात पोहचून शिकविण्याचे काम येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक जे. पी. पारधी करीत आहेत. 

आवश्य वाचा- धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास ! 

सोनगीर येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील एक नावाजलेली संस्था आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. बरेच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसला तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहेत. विद्यार्थी शाळेत येणे शासनाच्या आदेशाने शक्य नसले तरी शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंबे येथील शेतकऱ्यांच्या शेतात कायमस्वरूपी कामासाठी आले आहेत. त्यांच्या मुलांनी येथील विविध शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेपासून त्यांची कुटुंबे तीन ते चार किलोमीटर अंतरावर शेतातील झोपडीत राहतात. अनेक आदिवासी कुटुंबांच्या पालकांनी येथील एन. जी. बागूल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला असून त्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून शिक्षक थेट शेतात पोहचले आहेत. शेतात नैसर्गिक वातावरणात निरागस बालकांना शिकविण्यात दैवी आनंद प्राप्त होतो असे शिक्षक श्री. पारधी यांनी सांगितले. प्राचार्य बी. एच. माळी, उपप्राचार्य के. एन. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एस. सोनार यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षक आपल्या परीने शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी पोहचले आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songire students started going to the fields, the teachers reached out to teach in the fields