esakal | धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास !

३० पैकी १० उद्यानांची कामे रद्द झाली, उर्वरित २० ठिकाणी मात्र महापालिकेने हरितक्षेत्र विकासाचे काम सुरू केले. जानेवारीमध्ये या उद्यानांच्या स्थितीबाबत वस्तुस्थिती मांडली होती.

धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

 धुळे ः अमृत अभियानांतर्गत हरितक्षेत्र विकासासाठी शासनाने तीन वर्षांत कोट्यवधी रुपये मंजूर केले. यातून महापालिकेने शहरातील २० उद्यानांची कामे हाती घेतली. त्यातील एकही उद्यानाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाहीच, पण सद्यःस्थितीत झालेल्या कामांचाही दुर्दशा झाली आहे. काही उद्याने पूर्वीपेक्षा भकास आणि उजाड झाली, तर काही उद्याने गवताने भरली आहेत. काही ठिकाणी गुरंढोरं चरत आहेत. 

आवश्य वाचा-  खडसेंच्या राजकीय भूमिकेच्या प्रतीक्षेतील ‘अल्पविराम’! 
 

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत हरितक्षेत्र विकासासाठी शासनाने २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ अशा तीन वर्षांत एकूण पाच कोटी दोन लाख ५३ हजार ७० रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून महापालिकेने शहरातील ३० उद्यानांमध्ये हरितक्षेत्र विकासाचे नियोजन केले. मात्र, काही ठिकाणी हरितक्षेत्र विकासांतर्गत होणाऱ्या कामांचा पॅटर्न पसंत न पडल्याने नागरिकांचा विरोध झाला. विरोधासह इतर काही कारणांनी ३० पैकी १० उद्यानांची कामे रद्द झाली, उर्वरित २० ठिकाणी मात्र महापालिकेने हरितक्षेत्र विकासाचे काम सुरू केले. जानेवारीमध्ये या उद्यानांच्या स्थितीबाबत वस्तुस्थिती मांडली होती. त्यावेळी २० उद्यानांच्या कामांपैकी एकाही उद्यानाचे काम १०० टक्के झालेले नव्हते.

काही ठिकाणी हरितक्षेत्र विकासांतर्गत होणाऱ्या कामांचा पॅटर्न पसंत न पडल्याने नागरिकांचा विरोध झाला. विरोधासह इतर काही कारणांनी ३० पैकी १० उद्यानांची कामे रद्द झाली, उर्वरित २० ठिकाणी मात्र महापालिकेने काम १०० टहरितक्षेत्र विकासाचे काम सुरू केले. जानेवारीमध्ये ‘सकाळ'ने या उद्यानांच्या स्थितीबाबत वस्तुस्थिती मांडली होती. त्यावेळी २० उद्यानांच्या कामांपैकी एकाही उद्यानाचे क्के झालेले नव्हते. 

सद्यःस्थिती भकास 
कोरोनोच्या संकटापूर्वीही उद्यानांची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारी होत्या. कोरोनाच्या संकटात या उद्यानांची अवस्था आणखी खराब झाली आहे. काही ठिकाणी यापूर्वी झालेली कामेही गायब झाली, तर काही ठिकाणी गवताचे जंगल उभे राहिले आहे. काही ठिकाणी चक्क मुक्तपणे गुरंढोरं चरताना दिसतात. त्यामुळे हरितक्षेत्राच्या नावाखाली त्या-त्या भागातील नागरिकांना फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानांच्या जागा बंदिस्त झाल्याच, पण आता त्या नागरिकांसाठी उपयोगशून्य ठरत आहेत. 

असा होता निधी... 
२०१५-१६...एक कोटी ७६ हजार २७६ 
२०१६-१७...एक कोटी ६८ लाख १५ हजार ५१८ 
२०१७-१८...दोन कोटी ३३ लाख ६१ हजार २७६ 
एकूण...पाच कोटी दोन लाख ५३ हजार ७० रुपये 

या उद्यानांची कामे 
जानेवारी २०२० मध्ये महापालिकेच्या रेकॉर्डनुसार श्रीरंग कॉलनी, दोंदे कॉलनी, बडगुजर प्लॉट, सम्राटनगर, एकतानगर रेल्वेस्थानक, वाखारकरनगर, श्रीराम कॉलनी, अशोकनगर, तुळशीरामनगर, आनंदनगर, ओपन स्पेस-२ भाईजीनगरमधील उद्यानांचे ९० टक्के काम झाले होते. सर्वे क्रमांक ४५-१ समर्थनगर, हेमू कलानी कॉलनीतील उद्यानांचे काम ८० टक्के, तर कल्पतरू सोसायटी, संत गाडगेबाबा उद्यान, राजरंग कॉलनी, सर्व्हे क्रमांक १२-१३, एकवीरादेवी येथील उद्यानांचे काम ७५ टक्के, जानकीनगर २५ टक्के, तर अलंकार सोसायटीतील उद्यानाचे काम १० टक्के झाले होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे