सुरक्षित प्रवासाची हमी नावालाच... एसटीचे 462 अपघात 

parivahan bus
parivahan bus

जळगाव : ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीची लाइफलाइन असलेली लालपरी अर्थात "एसटी' काही दिवसांपासून सुरक्षित प्रवासाची हमी हे आपले ब्रीदच विसरलेली दिसत आहे. या बस सुसाट वेगाने चालत असल्याने बस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच गेल्या तीन वर्षांत 462 अपघात झाले. 

लालपरी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे आज रूप पालटले आहे. रस्त्यावरून धावणारी लाल रंगाची बस दुरून दिसली, तरी ओळखली जायची. आता मात्र खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीला काम देवून "शिवशाही' स्वरूपात एसी बस महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. एकीकडे बसचे रूप बदलत असताना दुसरीकडे मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची हमी लोप पावत आहे. राज्यातील रस्त्यांवरून बस धावत असताना अपघात होऊन प्रवाशांना हानी पोचली आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे साधारण पाच- सहा वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्स किंवा कालीपीलीतून प्रवास करण्याऐवजी बसची प्रतीक्षा केली जात होती. पण आज हे चित्र बदलले आहे. अपघात होण्यास रस्त्यांची दुरवस्था देखील कारणीभूत ठरत आहे. 

पंचावन्न जणांचा बळी 
मालेगावजवळ गेल्या महिन्यात बस थेट विहिरीत जाऊन पडली होती, यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु जळगाव जिल्ह्यांतर्गत बसच्या अपघातांची संख्या देखील कमी नाही. यात गेल्या तीन वर्षांत बसचे 462 अपघात झाले असून, यात 55 जणांना जीव गमवावा लागला आहे; तर 407 प्रवासी जखमी झाले आहेत. तीन वर्षात झालेल्या अपघातांमध्ये गेल्या सहा महिन्यांत किरकोळ आणि मोठ्या अपघातांची संख्या शंभरावर आहे. 

भंगार बसही रस्त्यावर 
राज्य परिवहन मंडळाच्या बसची कालमर्यादा साधारण आठ ते दहा वर्षांची देण्यात आली आहे. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर धावलेल्या बस लिलाव करून भंगारात काढल्या जातात. परंतु, महामंडळाची बस कालमर्यादा होऊन देखील त्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत. या धावणाऱ्या भंगार बस म्हणजे अपघातालाच निमंत्रण आहे. 


नव्या बस धोकादायक 
प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी एसी स्लिपर शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. तसेच नवीन बांधणीच्या लालपरी या बस देखील दाखल झाल्या आहेत. परंतु या नवीन बांधणीच्या बसच अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या बसला समोरून धडक बसल्यास पत्रा कापला जाऊन मोठा अपघात घडत असतो. शिवाय या बस लांब पल्ल्यावर चालविल्या जात असल्याने त्यांच्यावर स्पीड कंट्रोल देखील नसतो. 

बस अपघात दृष्टिक्षेपात 

वर्ष किरकोळ जखमी गंभीर जखमी मृत 
2016- 17 113 25 21 
2017- 18 111 16 20 
2018- 19 89 53 14 
एकूण 313 94 55  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com