`त्या` १२३ विद्यार्थ्यांना अखेर न्याय! `सकाळ`च्या लढ्याला `प्रहार`ची साथ

live
live

गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या वृत्ताची दखल घेत प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी दिल्लीदरबारी सूत्र हलवत अखेर या १२३ प्रशिक्षनार्थीना न्याय मिळवून दिला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची येत्या जूनमध्ये परीक्षा होणार असून सर्व परीक्षांचा निकाल एकाच वेळी लागणार असल्याने  १२३ विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाता जाता वाचले.
   
आयटीआय मधील प्रशिक्षणार्थींची आज नाशिक येथे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा झाली.परीक्षेपूर्वी चांदवड उपविभागातील ३३ विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध न झाल्याने या परीक्षेला बसता येणार नव्हते. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चांदवड कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे स्वीय सहाय्यक सागर आहिरे व उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे स्वीय सहाय्यक नितीन फँगाळ यांच्या मध्यस्थीने काल(ता.28) रात्री दहापर्यंत येथील अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती मात्र उशिरापर्यंत यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने अखेर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यकारी अभियंता मधुसूदन वाडे यांच्याशी संपर्क साधला होता.
 यानंतर या सर्व ते ३० विद्यार्थ्यांना या कार्यालयाकडून आपले ऑनलाईन गुण वेळीच भरण्यात आले असल्याचे लेखी कळविण्यात आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळपासून ठाण मांडून असलेले कार्यालय सोडले.
     दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला सातपूर आयटीआय येथे जमा झाले. तोपर्यंत दैनिक सकाळ द्वारे या सर्व विद्यार्थ्यांना आज होणाऱ्या परीक्षेला मुकणार असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते याची दखल घेत प्रहार शेतकरी नेते प्रकाश चव्हाण यांनी सातपूर आयटीआय येथे जात या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या आमदार बच्चू कडू यांच्या पर्यंत पोहचवल्या. 
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची आमदार बच्चू कडू यांनी दखल घेत दैनिक सकाळने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत आयटीआयच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून सूत्र हलविताच टिटीसी चे उपसंचालक के. सिंग यांनी सातपूर आयटीआय प्राचार्यांना या विद्यार्थ्यांच्या नवीन वेळापत्रक बाबत मेल केला यानुसार या सर्व विद्यार्थ्यांची येत्या जूनमध्ये परीक्षा होणार आहे. 


नाशिक जिल्ह्यातील चांदवड उपविभागातील ३३ प्रशिक्षणार्थी परीक्षेला मुकणार असल्याची बातमी दैनिक सकाळ ला वाचली. यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता नाशिक जिल्ह्यातील असे एकूण १२३ प्रशिक्षणार्थी असल्याचे समजले. तात्काळ त्यांची भेट घेत आमदार बचू कडू यांच्या पर्यत हा विषय पोहचवला त्यांनी दैनिक सकाळच्या वृत्ताचा हवाला देत प्रश्न मांडला.

-प्रकाश चव्हाण, शेतकरी नेते प्रहार नाशिक.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या चांदवड कार्यालयाकडून ऑनलाइन पद्धतीने गुण दिले नसल्याने आम्हाला आजच्या परीक्षेस बसता येणार नव्हते.दैनिक सकाळने आमच्या मांडलेल्या व्यथा व प्रहार संघटनेने दिलेली साथ यामुळेच हा प्रश्न सुटला.

- दत्तात्रय जाधव, प्रशिक्षणार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com