esakal | तळोद्यात नगरसेवकांकडून नागरिकांना मास्क वाटप करून केली जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

corona mask

महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूने कहर केला आहे. तळोदयात कोरोनाचे संशयित नसले तरी शासन, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

तळोद्यात नगरसेवकांकडून नागरिकांना मास्क वाटप करून केली जागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळोदा : येथील प्रभाग दोनमधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता संदीप परदेशी यांनी कोरोनाचा विषाणूपासून नागरिकांचा बचावासाठी प्रभागातील नागरिकांना मोफत मास्कचे वाटप केले. तसेच कोरोनाचा पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. माहिती पत्रकांचे वाटप केले. या उपक्रमामुळे दोन्ही नगरसेवकांचे कौतुक करण्यात येत आहे.
नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी हे प्रभागातील नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात, त्यामुळे त्यांची स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूने कहर केला आहे. तळोदयात कोरोनाचे संशयित नसले तरी शासन, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आपल्या प्रभागातील नागरिकांचे कोरोना विषाणूंपासून बचावाकरिता नगरसेवक श्री. क्षत्रिय व नगरसेविका सौ. परदेशी यांनी स्वखर्चातून मास्कचे वाटप केले आहे. प्रभागात घरोघरी मास्कचे वाटप केले.यावेळी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी आदी उपस्थित होते. याकामी त्यांना ल