सातपुड्यात सतर्कता, मग शहरात का नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

मालदा (ता. तळोदा), सिसा (ता. धडगाव), जयनगर,कोंढावळ आदी गावातील तरूणांनी  तरुणांनी एकत्र येत गावाच्या वेशीवर थांबत फेरीवाल्यांना व विनाकारण गावात प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे.

तळोदा : कोरोनाच्चा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात नागरिक कमालीचे सतर्क झाले असून ते आपापल्यापरीने दक्षता घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत आहेत. संक्रमित भागातून आपल्याकडू कुणी .येऊ नये किंबुहना त्याने वैद्दायकी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे. शिवाय रिकामे इखडेतिकडे फिरणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी  मालदा (ता. तळोदा), सिसा (ता. धडगाव), जयनगर,कोंढावळ आदी गावातील तरूणांनी  तरुणांनी एकत्र येत गावाच्या वेशीवर थांबत फेरीवाल्यांना व विनाकारण गावात प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे.

हेपण पहा - नागरिकांनो, या वेळेतच खरेदीसाठी बाहेर पडा! 

रोजगारासाठी इतर शहरात गेलेल्यांना मेडिकल चेकअप केल्याशिवाय गावात प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच इतरही अनेक निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत असून त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. मालदा गावात देखील युवकांनी एकत्र येत अनेक निर्णय घेतले आहेत. मालद्याचे सरपंच करुणा पावरा, उपसरपंच भाईदास वळवी व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी एकत्र येत परिसरातील नागरिकांना विनाकारण व फेरीवाल्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना गावात आल्यावर  डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून त्याचा रिपोर्ट दाखवल्याशिवाय गावात प्रवेशबंदी केली आहे. गावातील एकही व्यक्तीने कारण नसताना बाहेरगावी जाऊ नये, तसेच नातेवाइकांना देखील आपल्या गावात बोलवू नये, लग्न समारंभ, उत्तरकार्य व इतर कार्यक्रम कौटुंबिक पातळीवर घेण्यात यावे, असे निर्णय ग्रामस्थांनी घेतले आहे. याकामी गोपी पावरा, पोलीस पाटील सखाराम ठाकरे, मदन पावरा, सोनू पावरा, संजय खर्डे, राहुल खर्डे, दिनेश खर्डे, कल्याण खर्डे, आंबुलाल वळवी, प्रकाश खर्डे, दीपक खर्डे, शंकर ठाकरे, हरीश खर्डे, पवन खर्डे, धोनु खर्डे, युवराज वळवी आदी युवक परिश्रम घेत आहेत. 
 
वडाळी येथेही दक्षता 
वडाळी : येथील ग्रामपंचायतीतर्फे किराणा दुकानांनी वेळ पाळावी तसेच नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये यासाठी दुकानासमोर मार्किंग आखून देण्यात आलेली आहे. सरपंचांसह सदस्य कोरोनाबाबत काळजी घेण्‍याचे व विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. कोंढावळ येथेही तरूणांनी बाहेरच्यांना गावबंद केले असून तपासणी करूनच या असे आवाहन केले जात आहे, 

गावातील नागरिकांचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. गावात कोरोना बाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. नोकरी किंवा रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक गावाकडे येत आहे. त्यामुळे आधी त्यांची प्राथमिक तपासणीसाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यात येत आहे. 
- करुणा पावरा, सरपंच, मालदा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tadoda satpuda aria village entry stop corona virus young boy