निओवाईस नावाचा दृमिळ धूमकेतू दिसणार आकाशात !

निओवाईस नावाचा दृमिळ धूमकेतू दिसणार आकाशात !

तळोदा :मानवाची जिज्ञासा वाढवणारी एक अद्भूत खगोलीय घटना म्हणजे आकाशात खूप वर्षांनी दिसणारा धूमकेतू होय. असाच एक निओवाईस नावाचा धूमकेतू आज पासून पुढील वीस दिवसांपर्यंत भारतातून सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला दिसणार आहे. त्यामुळे खगोल प्रेमींसाठी हा धूमकेतू एक पर्वणी ठरणार आहे. या धूमकेतूचे नाव c2020 f3 असे देखील ठेवण्यात आले आहे. त्यात या अद्भुत घटनेची नोंद घेण्यासाठी भूगोल खगोल प्रेमी पुढे सरसावले आहेत. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने ढगाळ वातावरणात ही संधी किती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

आकाशातील भौगोलिक घटनांचे मानव जातीला हजारो वर्षापासून कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटी मानव विविध घटना अनुभवत असतो. नव्हे तर अवकाशात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर मानवाचे बारीक लक्ष असते. या सर्व पार्श्वभूमीवर अनेकदा डोळे दिपवणारे सुंदर दृश्य दृष्टीस पडत असतात. यात सूर्यग्रहणे , चंद्रग्रहणे ,इतर ग्रहांचे सूर्यावर अधिक्रमण अशा विविध घटना मानवाला नेहमी अभ्यासाची संधी देत असतात. 
या जुलै महिन्यात अशीच एक संधी खगोलप्रेमींना मिळणार असून भारतातून नियोवाईस हा धूमकेतू पुढील 20 दिवसांपर्यंत दररोज वीस मिनिटे दिसणार आहे. धूमकेतू म्हटले की कधीमधी उगवणारा असे म्हणून अनेकांची हेटाळणी केली जाते. मात्र तोच खराखुरा धूमकेतू ज्या वेळी आकाशात दर्शन देणार असल्याने मानवाचे कुतूहल जागे झाले आहे. 14 जुलैपासून दररोज हा धूमकेतू सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसणार आहे. तर 22 जुलै रोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे . केवळ उघड्या डोळ्यांनी हा धूमकेतू पाहता येणार असल्याने खगोलप्रेमींनी आनंद व्यक्त केला असून भारतात सध्या मान्सूनचा काळ असल्याने कोणाला तो धूमकेतू पाहण्याच्या संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू लंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखा आणि टणक असतो. यापूर्वी दर 76 वर्षांनी दिसणारा हॅलेचा धूमकेतू 11 एप्रिल 1986 मध्ये दिसला होता. त्यावेळी ही खगोलीय पर्वणी अनेकांनी अनुभवली होती. धूमकेतू सुद्धा सूर्यमालेच्या भाग असतात. ते सूर्याभोवती अति लंबवर्तुळाकार स्थितीत फिरतात. त्यामुळे त्यांचे कुतूहल आजही मानवाला आहे.  


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com