esakal | इलेक्‍शन नाही तरी आमदार पोहचले गावी... ग्रामस्‍थांना बसला धक्‍का
sakal

बोलून बातमी शोधा

mla rajesh padvi

आदिवासी पाडा म्‍हणजे समस्‍यांनी ग्रासलेला. राजकिय पुढाऱ्यांना मग अशा पाड्यांमध्ये जाण्यासाठी केवळ मतदानाच्या वेळी आठवण येते. मग निवडून आल्‍यानंतर पाड्याकडे  जाणाऱ्या रस्‍त्‍यावर देखील पावले वळत नाही. परंतु आता निवडणुक नाही तरी कधी नव्हे ते आमदार आपल्‍या गावात आले; ते देखील भवपावसात पायपीट करत आले. हे चित्र त्‍या आदिवासी पाड्यात राहणाऱ्यांना एक प्रकारचा धक्‍काच देणारे राहिले. 

इलेक्‍शन नाही तरी आमदार पोहचले गावी... ग्रामस्‍थांना बसला धक्‍का

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : मुसळधार पाऊस सुरू असताना सातपुड्यातील दुर्गम भागात जावून ग्रामस्‍थांशी चर्चा करण्याचे चित्र पाहण्यास मिळाले. भर पावसात दोनशे- अडीचशे लोकवस्‍ती मोठी बारी या आदिवासी‍या पाड्यात आमदार राजेश पाडवी यांनी भेट देवून ग्रामस्‍थांशी चर्चा केली.

तळोदा- शहादा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तळोदा तालुक्यातील अति दुर्गम भागातील ग्रुप ग्रामपंचायत अलवानला भेट दिली. तेथील समस्या जाणून घेतल्या. याचवेळी त्यांनी तेथील पाडा मोठी बारी येथे मुसळधार पावसात पायपीट करुन पाड्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शाळेची पाहणी केली. यावेळी केंद्रप्रमुख रंजना निकुंभे, मुख्याध्यापक नितीन शिंपी, सहशिक्षक सोन्या पाडवी, सरपंच जमनाबाई पवार, ग्रामसेविका रत्ना धनगर, जि. प. सदस्य प्रकाश वळवी, अशोक वळवी, अनिल पवार, विरसिंग पाडवी, बळीराम पाडवी आदी उपस्थित होते. 

शाळेलाही दिली भेट
मुसळधार पावसात सातपुड्याच्या दुर्गम भागातील मोठी बारी (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस आमदार राजेश पाडवी यांनी भेट देवून शाळेची पाहणी केली. तसेच दुर्गम भागात असून देखील शाळेत असलेल्या सुविधा बघून आमदारांनी शाळेचे कौतुक करीत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे उत्कृष्ट कामगिरी बद्दल शाळेला पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस करण्यात येईल असे सांगितले.

गावकरी झाले भावूक
मोठी बारी गावातील रस्ते, पाणी या सुविधांबाबत शासनाकडे वारंवार मागणी करुन सुद्धा आजपर्यंत प्रशासकीय अथवा राजकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नव्हते. त्यामुळे गावात पहिल्यांदाच कोणीतरी मोठा राजकीय नेता आल्यामुळे गावकरी भावुक झाले होते. त्यांनी आमदारांना आपल्या समस्यांबाबत अवगत केले. आमदार राजेश पाडवी यांनी लवकरात लवकर त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे