महापालिकेतर्फे १७ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आले. 

नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आले. 

  पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून महापालिकेlतर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली जाते. सन 2017 व 2018 मध्ये पुरस्कार वितरणात खंड पडला होता. यंदा मात्र शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला पुरस्कार्थींची नावे घोषित करण्यात आली. महापालिकेकडे एकुण वीस प्रस्ताव सादर झाले होते. प्रस्तावांची छाननी करून सेवा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुध्दीमत्ता वाढीसाठीचे प्रयत्न शैक्षणिक कार्य, शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न, साक्षरता अभियान, राष्ट्रीय, सामाजिक व सार्वजनिक उपक्रमातील सहभाग आदीं बाबींचा विचार करून 17 शिक्षकांची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

   निवड समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त बी.जी.सोनकांबळे, शिक्षण समिती सभापती सरिता सोनवणे, समितीच्या सदस्या शासकीय अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप, राष्ट्रपती पारोतोषिक विजेते अर्जुन ताकाटे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी व समितीचे सचिव देविदास महाजन यांनी पुरस्कार्थींची निवड केली. येत्या सहा सप्टेंबरला कालिदास कलामंदीर मध्ये पुरस्कारांचे वितरण होईल. पालकमंत्री गिरीष महाजन, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम.एस. गोसावी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सिमा हिरे, योगेश घोलप, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. 
 

आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी 
महापालिका प्राथमिक शाळा- छाया तिवडे, सोमनाथ गावित, नितीन वाजे, सुरेश खांडबहाले, कविता वडघुले, जयंत येवला, सावली शिरसाठ, शिवाजी शिंदे, भुपेंद्र शुक्‍ल, दिपाली रायते, सुवर्णा थोरात, सुवर्णा जोपळे. 
खासगी प्राथमिक शाळा- सुगंधा सोनवणे (मुख्याध्यापिका वैंशपायन विद्यालय, कामटवाडे), लक्ष्मी कस्तुरे, विष्णु आव्हाड, सुनिता जाधव. महापालिका माध्यमिक शाळा- अरुण दातीर (मुख्याध्यापक, अंबड). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news teacher award