टोमॅटो भावाची "लाली' वाढली, बटाट्याचा भाव 2016 प्रमाणे किलोला 25 रुपये

residentional photo
residentional photo

नाशिक ः पावसामुळे लागवडीला झालेल्या विलंबाच्या जोडीला अवकाळीने नुकसान केल्यामुळे टोमॅटोच्या भावाची "लाली' वाढली. गेल्या आठवड्यापर्यंत 6 रुपये किलोपर्यंत भाव घसरलेले असताना आता मात्र 15 रुपये किलोपर्यंत भावाने उसळली घेतली. त्याचप्रमाणे बटाट्याला 2016 प्रमाणे भाव मिळू लागला असून बटाट्याचा भाव किलोला 25 रुपयांपर्यंत पोचला आहे. 

देशामध्ये आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, हरियाना आणि हिमाचलप्रदेशमध्ये टोमॅटोचे 90 टक्के उत्पादन घेतले जाते. देशात वर्षभरामध्ये 188 लाख 68 हजार टन टोमॅटोचे उत्पादन अपेक्षित असताना गेल्यावर्षी 197 लाख 59 हजार टनाचे उत्पादन झाले. यंदाच्या तिसऱ्या अंदाजानुसार 193 लाख 96 हजार मेट्रीक टनाचे उत्पादन अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील पिकांच्या नुकसानीचा परिणाम

छत्तीसगड, गुजरात, हरियाना, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरिपामध्ये 12 टक्के कमी लागवड झाली. अवकाळी पावसाने मध्यप्रदेशात 13 आणि कर्नाटकमध्ये 7 टक्के टोमॅटोचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे आंध्रप्रदेश, तमिळनाडू कर्नाटक आणि काढणीला आलेल्या महाराष्ट्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम, बाजारपेठेतील आवकवर दिसून आला. सर्वसाधारणपणे ऑक्‍टोंबरमध्ये 3 लाख 38 हजार टन टोमॅटो देशात विक्रीसाठी येतो. गेल्यावर्षी 4 लाख 43 हजार टन, तर यंदा साडेतीन लाख टन टोमॅटो विक्रीसाठी आला. एवढेच नव्हे, तर जानेवारी ते ऑक्‍टोंबर या कालावधीत 30 लाख 29 हजार टन टोमॅटोची आवक अपेक्षित  आहे.

देशातील आवक घटली

गेल्यावर्षी 34 लाख 51 हजार टनाची आवक झाली होती. यंदा 25 लाख 83 हजार टनाची आवक झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत देशातील आवक 8 लाख 68 हजार टनाने कमी झाली आहे. भावाची स्थिती पाहता, ऑक्‍टोंबर 2018 मध्ये टोमॅटोला देशात सरासरी 16 रुपये किलो भाव मिळाला होता. गेल्या महिन्यात 29 रुपये किलो भावाने टोमॅटो विकला गेला. सप्टेंबर 2019 मध्ये 22 रुपये 36 पैसे असा किलोचा भाव देशात राहिला. 


क्षेत्रात जगात तिसरा अन्‌ उत्पादनात दुसरा क्रमांक 
जगामध्ये बटाट्याच्या क्षेत्रात देशाचा तिसरा अन्‌ उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, पंजाब, आसाम, हरियाना, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये बटाट्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. बटाट्याचे देशामध्ये सर्वसाधारणपणे वर्षभरात 465 लख 80 हजार टनाचे उत्पादन होते. गेल्यावर्षी 513 लाख 10 लाख टनाचे उत्पादन झाले होते. तिसऱ्या अंदाजानुसार यंदा 530 लाख 27 हजार टनाचे उत्पादन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र बाजारातील आवकची स्थिती निराळी आहे. जानेवारी ते ऑक्‍टोंबर या कालावधीत 133 लाख 76 हजार टन बटाटा बाजारात विक्रीस येणे अपेक्षित असते. गेल्यावर्षी 97 लाख 21 हजार, तर यंदा 98 लाख 40 हजार टन बटाटा विक्रीसाठी आला.

इंदूरमध्ये 22 रूपये किलो

ऑक्‍टोंबरमध्ये 8 लाख 20 हजार टन बटाट्याची विक्री अपेक्षित असताना गेल्यावर्षी 9 लाख 63 हजार टनाची विक्री झाली. गेल्या महिन्यात 8 लाख 10 हजार टन बटाटा विकला गेला. म्हणजेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत दीड लाख टनांहून अधिक बटाटा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. सूरतमध्ये गेल्यावर्षी ऑक्‍टोंबरमध्ये 12 रुपये किलो भावाने विकलेल्या बटाट्याला आज 26 रुपये किलो असा भाव मिळाला. नाशिकमध्ये गेल्यावर्षी दहा रुपये किलो बटाट्याचा भाव राहिला असताना आता 23 रुपये किलोपर्यंत भाव पोचला. इंदूरमध्ये दहा रुपये किलो गेल्यावर्षी ऑक्‍टोंबरमध्ये बटाटा विकला गेला होता. आज इथे 22 रुपये किलो असा भाव राहिला. 
... 

टोमॅटोचे बाजारातील भाव 
(क्विंटलला रुपयांमध्ये) 

बाजारपेठ आजचा भाव ऑक्‍टोंबर 2018 चा भाव 
सूरत 1 हजार 600 1 हजार 300 
बेंगळुरु 1 हजार 800 1 हजार 600 
इंदूर 2 हजार 800 
कोल्हापूर 1 हजार 500 1 हजार 600 
पुणे 1 हजार 200 1 हजार 200 
उज्जैन 1 हजार 850 800 
पिंपळगाव 1 हजार 555 1 हजार 505 

बटाट्याच्या भावाची स्थिती 
(क्विंटलला रुपयांमध्ये) 

बाजारपेठ आजचा भाव ऑक्‍टोंबर 2018 चा भाव 
बेंगळुरु 1 हजार 800 1 हजार 500 
नागपूर 1 हजार 900 1 हजार 400 
पुणे 2 हजार 500 2 हजार 
जळगाव 2 हजार 100 700 
औरंगाबाद 2 हजार 200 800 
सोलापूर 2 हजार 850 
  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com