
नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेषतः या खटल्याचा निकाल तब्बल 14 वर्षांनी लागला असून, दंडाची रक्कम एका महिन्यात भरण्याचे आदेश दिले आहेत. योगेश जीवन मोहिते असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कमलाकर पांगारकर यांच्याकडून आरोपी योगेश मोहिते याने दोन लाख रुपये उसनवार घेतले होते. संबंधित रक्कम परत करण्यासाठी 20 जानेवारी 2005 ला जनकल्याण बॅंकेचा धनादेश दिला होता.
चौदा वर्षांनंतर तीन लाखांचा दंड
संबंधित धनादेश न वटल्याने पांगारकर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित खटल्याचा 9 जून 2016 ला कनिष्ठ न्यायालयाने निकाल देताना आरोपी मोहिते यास सहा महिने कारावास आणि दोन लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु आरोपी मोहिते याने याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. न्या. एस. टी. पांडे यांनी आरोपी मोहिते यास तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दोन लाख 75 हजार रुपये फिर्यादीस देण्याचेही आदेश दिले आहेत. फिर्यादीतर्फे ऍड. धर्मेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा > अपघातांच्या खटल्यात चक्क दीड कोटीची भरपाई?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.