उध्दव ठाकरे यांचा आज  नांदगावला शेतकरी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

नाशिक ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.22) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 17 पीक विमा मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्यापैकी नांदगाव तालुक्‍यात शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देउन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री ठाकरे यांचा दौरा असून उद्या शनिवारी (ता.22) नांदगावला शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देउन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहे. त्यानुसार, शिवसेनेतर्फे तालुकास्तरावर पीकविमा केंद्राचा उपक्रम सुरु झाला आहे. शिवसेनेच्या स्थापनादिनी सिन्नर व इगतपुरीत कार्यक्रम झाले. त्यानंतर आता नांदगावला कार्यक्रम होणार आहे. 
शिवसेनेतर्फे जिल्ह्यात 17 ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शिवसेना स्थापनादिनापासून त्यांवर शेतकऱ्यांची माहीती संकलित करण्याचे कामकाज सुरु करण्याच्या सूचना आहेत. 
शेतकरी संवाद 
श्री ठाकरे दुपारी दोनला नांदगाव येथील पीक विमा मदत केंद्राला भेट देउन तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करतील. शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे सचिव मिलींद नार्वेकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, ÷उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे समन्वयक रविंद्र मिर्लेकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ते नाशिकला मुक्कामी येतील. त्यानंतर रविवारी (ता.23) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होतील. असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news uddhav thakre discussion