esakal | सकाळ इम्पॅक्ट-कचऱ्याच्या ढिगावर 90 टक्के कॅपिंग 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

सकाळ इम्पॅक्ट-कचऱ्याच्या ढिगावर 90 टक्के कॅपिंग 

sakal_logo
By
विक्रांत मते-सकाळ वृत्तसेवा

 
नाशिक- विल्होळी डेपोत कचऱ्याच्या डोंगरावर कॅपिंग करण्याची प्रक्रिया नव्वद टक्के पुर्ण झाल्याने आजुबाजूच्या गावांमध्ये होणारा रसायनयुक्त पाण्याचा निचरा कमी होण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. सध्या पावसामुळे कॅपिंगचे कामात अडथळा निर्माण झाला आहे. उर्वरित कॅपिंगचे काम डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. "सकाळ' च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने कचरा डेपोच्या परिसरातील आठ ते दहा गावांना दिलासा मिळाला आहे. 

विल्होळीच्या खतप्रकल्पातील (कचरा डेपो) कचऱ्याची पूर्णक्षमतेने विल्हेवाट करण्याचे काम पुर्णपणे बंद पडले होते. परिणामी कचऱ्याचे ढिगावर ढिग साचून मोठा डोंगर तयार झाला होता. कचऱ्याचा ढिग तयार झाल्याने तळाच्या कचऱ्याचे विघटन होवून रासायनिक द्रव तयार झाले होते. रासायनिक द्रव पाथर्डी, पिंपळगाव खांब, गौळाणे, वाडीचे रान पुढे वालदेवी नदीला मिळतं असल्याचे सकाळच्या पाहणीतुन स्पष्ट झाले होते. रासायनिक पाणी परिसरातील 20 ते 22 विहीरींमध्ये उतरल्याने येथील पाणी देखील दुषित झाले होते. तेच पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याने भाजीपाला, फळभाज्या देखील दुषित पिकतं होत्या. 
रसायनयुक्त पाणी गौळाणे गावातून गेलेल्या नैसर्गिक नाल्यामधून थेट वालदेवी नदीत झिरपत असल्याचे पाहणीत आढळून आले होते. यासंदर्भात सविस्तर वृत्त मालिकेच्या स्वरुपात 3 ते 5 एप्रिल 2018 या कालावधीत प्रसिध्द करण्यात आले होते. रासायनिक पाण्यामुळे तसेच विषारी भाजीपाल्यामुळे गॅस्ट्रो, श्‍वसन, पोटदुखी, बालदम्याचे आजार बळावतं असल्याचे मत स्थानिक डॉक्‍टरांनी व्यक्त केले होते. 

प्रदुषण मंडळाकडून दखल अन्‌ कारवाईस गती 
या मालिकेची दखल घेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पाहणी केली. तर महापालिकेच्या वतीने तातडीने कचऱ्याची विल्हेवाट करण्याची कारवाई सुरु केली होती. पुणे स्थित मेलहॅम ऑयकॉस कंपनीला खत प्रकल्प चालविण्याचे काम देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कचयाची विल्हेवाट लावणे शक्‍य नसल्याने कचऱ्याच्या डोंगरावर कॅपिंग तसेच त्या भागात वृक्ष लावण्याचा पर्याय निवडण्यात आला होता त्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनीतर्फे कॅपिंगचे काम पुर्णत्वाकडे येत असून पावसामुळे दहा टक्के काम शिल्लक असल्याचे महापालिकेचे उपअभियंता बाजीराव माळी यांनी माहिती दिली. 
------------- 

loading image
go to top