दुर्दैवी घटना ः खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

घरात झोका खेळत असतांना अचानक झोक्याचा पीळ पडुन दोरीचा फास गळ्याला बसला त्यात त्याचा मृत्यु झाला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : घरात झोका खेळतांना दोरीचा गळफास बसून तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना कळमडू (ता.चाळीसगाव) येथे आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत तरूण आई वडिलांचा एकलुता एक होता. त्याच्या मृत्युने कळमडू गावा हळहळ व्यक्त होत आहे.

धक्कादायक ः मुल गाड झोपेत...तीने का ? उचलले असे पाऊल ! 
 

कळमडू (ता.चाळीसगाव) येथील चंद्रगुप्त राजेंद्र सोनवणे (वय21) हा तरूण जळगाव येथे शासकिय इंजिनिअरींग कॉेलेजमध्ये शिकत होता. सध्या लॉकडाऊनमुळे तो घरी आलेला होता. आज दुपारी चारच्या सुमारास तो घरात झोका खेळत असतांना अचानक झोक्याचा पीळ पडुन दोरीचा फास गळ्याला बसला त्यात त्याचा मृत्यु झाला. चंद्रगुप्त याची आई बाहेर गेलेली होती.घरी परल्यावर मुलगा दोरीच्या फासात अडकल्याचे दिसताच त्या माऊलीने एकच टाहो फोडला. याप्रकरणी पोलीस पाटील सुनील  मोरे यांनी दिलेल्या माहीतीवरुन मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हावलदार पृथ्वीराज कुमावत करीत आहेत.

क्‍लिक कराः अमळनेरला कोरोना कोविड केअर सेंटर सज्ज

मयत चंद्रगुप्त सोनवणे याची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यास दोन बहिणी असून त्यांचा विवाह झालेला आहे. तर वडिल दुसऱ्यांच्या शेती कसून संसाराचा गाडा चालवत होते. चंद्रगुप्त हा जळगाव येथे शासकीय इंजिनिअरींग कॉलेजधमध्ये मेकॅनिक डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होता. एकलुत्या एका मुलाच्या मृत्युने कळमडू गावात शोककळा पसरली आहे.

आर्वजून पहा :  कोरोना वॉर्डात अमळनेरच्या एकाचा मृत्यू 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yong man playin zoka rope Throat and deth