ममुराबाद रेल्वेपुल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो बंद होता. या पुलाचे आता काम पूर्ण झाले असल्याने शुक्रवार (ता. 26) पासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. 

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो बंद होता. या पुलाचे आता काम पूर्ण झाले असल्याने शुक्रवार (ता. 26) पासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. 

शहरातील शिवाजीनगरला जोडणारा शिवाजीनगर रेल्वेउड्डाणपूल जीर्ण झाल्याने नवीन पूल तयार करण्याचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांना सुरत व असोदा रेल्वेगेटमार्गे 8 ते 10 किलोमीटरच्या फेऱ्याने शहरात यावे लागत आहे. शनिपेठमार्गे जवळचा पर्यायी रस्ता आहे. परंतु या नाल्यावरील रेल्वेपुलाचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे. आता रेल्वेपुलाखालील काम पूर्ण झाले असून या पुलाखालून मिनी बस, स्कूल बस, रुग्णवाहिका, दुचाकी, तीनचाकी असे वाहनांसाठी हा पूल शुक्रवारी सकाळी दहापासून खुला होणार आहे. 

कॉंक्रिट रस्त्याचे काम पूर्ण 
शिवाजीनगर वासीयांनी28 मार्चला यासंदर्भात रेल रोको आंदोलन पुकारल्यानंतर रेल्वे प्रशासनाने 10 एप्रिलपर्यंत ममुराबाद रस्त्यावरील रेल्वेपुलाचे काम पूर्ण करून तो खुला केला जाईल, असे आश्‍वासन दिले. परंतु प्रत्यक्षात काम बाकी असल्याने सात दिवसांची मुदत वाढवून रेल्वे प्रशासनाने हे काम पूर्ण केले. 

अवजड वाहनांना बंदी 
रेल्वे पुलाच्या खालून मोठे व अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रेल्वेच्या पुलाचे हाईट तसेच नवीन रेल्वेलाईनवरी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे मध्यम उंचीचे वाहने जाऊ शकतील. परंतु ट्रॅक, बस आदी अवजड वाहने जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन उद्या (ता. 25) हाईट क्रॉसबार बसविणार आहे. 

लेंडी नाल्यावरील पूल काम सुरू 
लेंडी नाल्यावरील महापालिकेतर्फे सुरू असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. नाल्यावर पूल उभारला गेला असून त्यावर स्लॅब टाकला गेला आहे. रात्र दिवस पुलाचे काम सुरू असून अजून पुलाचे संरक्षण भिंत, भराव, रस्ता तयार करणे बाकी असून त्याला 25 दिवसाचा अवधी लागेल. 20 मे पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. 

ममुराबाद नाल्यावरील रेल्वेपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाखालून मध्यम उंचीच्या वाहनांसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. 
- रोहित थावरे, उपअभियंता, रेल्वे बांधकाम विभाग 

लेंडीनाल्यावरील पुलाचे काम अजून बाकी आहे. ते पूर्ण होण्यास अजून 25 दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे ममुराबाद पुलमार्गे शुक्रवारपासून सुरू होणारी वाहतूक ही चौघुले प्लॉट, कांचननगर मार्गे जाता येईल. 
- सुनील भोळे- बांधकाम अभियंता, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi newsjalgaon mamurabad rialway brige open