Family Sets an Example with Socially Aware Card : महाजन कुटुंबीयांनी लग्नपत्रिकेच्या माध्यमातून दिलेले समाजप्रबोधनाचे संदेश आणि विवाहपूर्व वृक्षारोपणाचा निर्णय समाजासाठी ठरतोय प्रेरणादायी!
पारोळा- आजच्या सोशल मीडियाच्या युगात विवाह सोहळ्याला आमंत्रित करण्यासाठी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार यांना लग्नपत्रिका द्यावी लागते. या लग्नपत्रिकेत समाज जनजागृती करणारे संदेश देऊन येथील महाजन परिवाराने सामाजिक प्रबोधन केले आहे.