महिलांवर कुंटूब नियोजनाची शस्ञक्रिया केल्या; दुसऱ्या दिवशी सुरू झाला त्रास आणि डाॅक्टरसह कर्मचारी गैरहजर

महिलांवर कुंटूब नियोजनाची शस्ञक्रिया केल्या; दुसऱ्या दिवशी सुरू झाला त्रास आणि डाॅक्टरसह कर्मचारी गैरहजर

चिमठाणे : चिमठाणे (ता.शिंदखेडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या बुधवारी (ता.3) कुंटूब नियोजनाच्या 16 महिलांनवर शञ्सक्रिया करण्यातात आली होती. रविवारी राञी वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी गैरहजर होते.

काही महिलांना राञी ञास जानवत होते.आज वैद्यकीय अधिकारी डाॅ सुहास सोनवणे हे सकाळी सव्वा आकरा वाजता उशीरा आल्याने महिलासह रूग्ण तात्कळत बसले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी वालीच नाही अशी माहिती उपस्थित महिलांनी दिली.


चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत 25 गावाचा समावेश होतो. बुधवारी महिला कुंटूब नियोजनच्या अमराळे (सहा महिला) ,परसामळ , दलवाडे (प्र.सोनगीर) , शेवाडे व आरावे येथील प्रत्येकी दोन तर साळवे व तामथरे येथील प्रत्येकी एक महिलांवर शञ्सक्रिया करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना सात दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबावे लागते. राञीच्य वेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, परिचर व वाहन चालक थांबणे गरजेचे असताना रविवारी रात्री फक्त परिचर व वाहन चालक हजर होते. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका गैरहजर होते. राञी काही महिलांना राञभर ञास सहन करावा लागला. 

डाॅक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची दांडी  !
वैद्यकीय अधिकारी डाॅ सुहास सोनवणे व औषध निर्माण अधिकारी विठ्ठल भंडारी हे आज आठवड्या पहिला दिवस असतांना हजर राहणे गरजेचे होते. वैद्यकीय अधिकारी डाॅ सोनवणे हे सव्वा आकरा वाजेला आले तर औषध निर्माण अधिकारी भंडारी हे उशीरा पर्यत आले नव्हते. डाॅ सोनवणे हे साक्री व औषध निर्माण अधिकारी भंडारी हे शिरपूर येथून अपडाऊन करतात. तरीही त्यांना घरभाडे भत्ता दिला जातो कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 
 

" चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी नऊ वाजता ञास जानवू लागल्याने गेली आसता वैद्यकीय अधिकारी सोनवणे हे उपस्थित नसल्याने मोठया प्रमाणात महिला व पुरूष रूग्ण तात्कळत होते. सव्वा आकरा वाजता डाॅ सोनवणे आले. त्या नंतर रुग्णांची तपासणी करण्यात आली."
- कलाबाई हिलाल चौधरी, रा.चिमठाणे. 

" चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ सुहास सोनवणे यांच्या विरोधात येथील जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिह गिरासे यांनी तक्रार केल्याने त्यांची चौकशी सुरू असल्याने लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. 
- डाॅ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com