...हे करणे टाळा
दारू हा उपाय नाही. मद्यपान करणे टाळा
दारुच्या नशेत भावना वाईट विचार येऊ शकतो
तणावाच्या काळात एकटे राहणे टाळाच
ताणतणावात स्वतः वाहन चालविण्याचा हट्ट नको
एकटेच कुठेतरी निघून जावेसे सतत वाटल्यास तसे करू नका.जळगाव- अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, कौटुंबिक वादविवाद चिंतेचे कारण बनले आहे. त्यामुळे अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. वर्षभरात जवळपास एक हजार नैराश्यग्रस्तांनी आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले आहे. कुठल्याही कारणासाठी स्वतःचा जीव देणे योग्य नाही.