Dhule : गायकवाडांशी हुज्जत घालणारे ताब्यात; ‘MIM’चा ठिय्या

MIM office bearers during a sit-in protest in the hall of the Resident Sub-District Officer on Thursday
MIM office bearers during a sit-in protest in the hall of the Resident Sub-District Officer on Thursdayesakal
Updated on

धुळे : पैगंबर जयंतीनिमित्त शहरात दारु विक्री बंद ठेवावी व स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, असे निवेदन देण्यासाठी गुरुवारी (ता. ६) दुपारी बाराच्या सुमारास एमआयएमचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच जणांनीच दालनात यावे, असे सांगताच आंदोलक संतापले. (MIM Stand for liquor prohibition in hall of Resident Deputy Collector Sanjay Gaikwad dhule news)

त्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शहर पोलिस ठाण्याने ताब्यात घेतले. आंदोलकांनी हुज्जत घालण्यास सुरवात करताच उपजिल्हाधिकारी गायकवाड दालनातून निघून गेले. त्यामुळे आंदोलकांनी दालनात ठिय्या मांडला. नंतर आंदोलकांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवले.

यावर हरकत घेत निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड आणि आंदोलकांमध्ये शाद्बिक चकमक उडाली. हा गोंधळ वाढत असल्याने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक हटायला तयार नव्हते.

MIM office bearers during a sit-in protest in the hall of the Resident Sub-District Officer on Thursday
Yeola Balaji Rathotsav : बालाजीच्या रथाची मिरवणूक; 350 वर्षांची परंपरा

पोलिसांनी बळाचा वापर करून जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक, मुक्तार बिल्डर, रफीक पठाण शाह, गणी डॉलर, समीर मिर्झा, साई साजित, सलीम शाह, आरिफ शेख, जाविद मिस्तरी, शोएब मुल्ला, वशीम पिंजारी, माजित पठाण, केसर पेंटर, हालीम अन्सारी, आसिफ शाह, युसूब मुल्ला, खालीद नोकिया, सोऊद सरदार, फेसल अन्सारी आदींना ताब्यात घेत नंतर समज देऊन सोडून दिले. ९ ऑक्टोबरला पैगंबर जयंती साजरी होत आहे.

MIM office bearers during a sit-in protest in the hall of the Resident Sub-District Officer on Thursday
Nashik : नूतन विद्या प्रसारक मंडळाचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com