
शिवसेनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीपासून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत.
नंदुरबार ः ग्रामपंचायतींना विकासासाठी लागणारा भरघोस निधी शासनातर्फे देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यासाठ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवून भाजपला त्यांची जागा दाखवा असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (minister abdul sattar ) यांनी विधान केले.
आवश्य वाचा- मनसेने दिला इशारा..अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याची तयारी
शिवसेनेतर्फे शहरातील श्रीरामवाडीत झालेल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मंजुळा गावित, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, दीपक गवते, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, देवेंद्र जैन, महिला आघाडीप्रमुख रीना पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गावपातळीपर्यंत विकास करू
राज्यमंत्री सत्तार म्हणाले, की जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीपासून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व डॉ. विक्रांत मोरे यांच्या प्रयत्न व नियोजनाने हे शक्य होऊ शकते. आपल्या जिल्ह्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनदरबारी मी प्रयत्न करेन. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
संपादन- भूषण श्रीखंडे