काटकोन आकारात वसले गाव पाहून जयंत पाटलांना पडले आश्चर्य; आणि जाणून घेतला ऐतिहासीक वारसा ! 

 विनोद शिंदे
Wednesday, 10 February 2021

प्रत्येक गल्लीनुसार केलेली समाजव्यवस्था, एका रेषेत असणाऱ्या गल्ल्या बघून मंत्री महोदयांनी आश्चर्य व्यक्त केले.

कुसुंबा (ता.जि.धुळे) ः राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादिचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) हे मंगळवारपासुन धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. यावेळी एका गावाची रचना, गल्ली, रस्ते पाहून जयंत पाटील आश्चर्यचकीत झाले. आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून गावाचा ऐतिहास जाणून घेतला.  

आवश्य वाचा- चांगली बातमी: जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त १०० कोटी 
 

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादिचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे धुळे जिल्ह्याच्या परिसंवाद यात्रेच्या दौऱ्यावर आहेत. ते शहरासह धुळे ग्रामीण भागातील पक्षाच्या पदाधिकांऱ्यांसह,कार्यकर्त्यांशी परीसंवाद करीत मते जाणून घेत आहे. आज साक्रीकडे जात असतांना महामार्गावरील कुसुंबा येथे राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत, अल्पोपहार घेतला. या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती.रूपालीताई चाकणकर,मेहबुब शेख, सुरज चव्हाण,सुनिल गव्हाणे,रविकांत वर्पे,अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील,शहराध्यक्ष रणजीतराजे भोसले, सुनिल नेरकर, प्रा.शरद पाटील आदिंसह राष्ट्रवादिचे पदाधिकारी उपस्थित होते.

अन गावाची माहिती घेतली 

यावेळी जयंत पाटील यांनी कुसुंबा गावाची रचना बघुन कुसुंब्यांची ऐतीहासीक वारसा जाणुन घेण्याची उत्सुकता दाखवली, कुसुंब्यांची रचना थोर अभियंते सर विश्वेश्वरय्या यांनी केली असून एका रेषेत काटकोनात गांवाची रचना केली आहे, इंग्रज अधिकारी साईक्स चॅलेंज यांनी गावाला भेट देऊन ताम्रपट (साईक्स चॅलेंज कप) देऊन गौरव केला आहे.
 

आवर्जून वाचा- महिला सदस्यांच्या नशिबी सत्कारही नाही  ​
रचना बघून मंत्री महोदय झाले आश्चर्य चकीत

 मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्येक गल्लीनुसार केलेली समाजव्यवस्था, एका रेषेत असणाऱ्या गल्ल्या बघून मंत्री महोदयांनी आश्चर्य व्यक्त केले, कुसुंबा गांवाचे नांव कसे पडले, येथिल ऐतिहासीक आमराई,पांझरेचे पात्र,परदेशी समाजाचे भुंजरीया सण,ललित महोत्सवात होणारे नाटकं,वैराग्याचे प्रतीक असलेले जैन बांधव,शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणारे कै.मोतीराम कडू शिंदे,कै.महादु नागो चौधरी,घरांघरांत असलेले प्राथमिक शिक्षक तसेच कुसुंब्यांतील सामाजिक एकोपा व विविध स्तरांतील ऐतीहासीक माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे व माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी मंत्री महोदयांना सांगीतल्याने त्यांनी कुतुहुलाने जाणुन घेत आश्चर्य व्यक्त करीत कौतुकही केले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister jayant patil marathi news kusumba dhule amazed see ncb minister jayant patil structure village