Dhule City Survey : सिटी सर्व्हेच्या मागणीबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल; कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Misled by authorities regarding demand for city survey dhule news

Dhule City Survey : सिटी सर्व्हेच्या मागणीबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल; कारवाईची मागणी

धुळे : शहरातील चितोड रोड भागातील सर्व्हे नंबर ५२९/१ ब बिनशेती झालेले असून, त्यावर नागरिकांचे नाव लावून सिटी सर्व्हेचे उतारे मिळण्यासह खरेदी सुरू होण्यासाठी व तहसील कार्यालयात सबरजिस्टरला नाव लावण्यासाठी आदेश व्हावेत. (Misled by authorities regarding demand for city survey dhule news)

दरम्यान, या संदर्भात चुकीचे काम करणाऱ्या व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संबंधित चितोड रोडवरील ५२९/१ ब (तुळसाबाईचा मळा) येथील १८८ पैकी दोन जणांचे सिटी सर्व्हेला नाव लावण्यात आले. मग उर्वरित १८६ जणांचे नाव लावण्यास काय अडचण आहे, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात मागणी घेऊन जाताना विविध कार्यालयातील अधिकारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे, पत्रे देऊन आमची दिशाभूल व वेळकाढूपणा करत आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तसेच एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या मागणीपासून वंचित राहावे लागत आहे. विविध आंदोलने करूनदेखील अद्याप मागणी मान्य करण्यात आलेली नाही. नागरिकांना सिटी सर्व्हेचे उतारे द्यावेत. बिनशेती आदेशाची अंमलबजावणी करावी. तत्काळ खरेदी सुरू करावी. तहसील कार्यालयात खरेदी झालेल्या लोकांचे नाव लावण्यासाठी कार्यवाही करावी.

आजपर्यंत चुकीचे काम करणारे व नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही तक्रारकर्त्या रहिवाशांनी दिला आहे. विनोद जगताप, राजू शिंदे, वसंत माळेकर, धनराज भिवसेन, सुनील ठाकूर, प्रभाकर चौरे, अशोक मोरे, प्रवीण मराठे, सोमनाथ कोळी, योगेश चौधरी, गणेश मराठे, भटू कोळी आदींनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शर्मा यांना दिले.

टॅग्स :DhuleDistrict Collector