Unseasonal Rain : शिंदखेडा तालुक्यात वीज पडून म्हैस, बैल ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The intensity of the lightning was such that the tree was burnt.

Unseasonal Rain : शिंदखेडा तालुक्यात वीज पडून म्हैस, बैल ठार

चिमठाणे (जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. वीज पडून साळवे येथे बैल, तर भडणे येथे म्हैस ठार झाली. (unseasonal rain Buffalo bull killed by lightning in Shindkheda dhule news)

वादळी वाऱ्यामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका, दादर व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भडणे शिवारात तरामसिंग तानकू वाघ यांच्या मालकीची गीर जातीची जाफर म्हैस झाडाला बांधलेली असताना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास वीज पडून ठार झाली.

भडणे येथील पोलिसपाटील युवराज माळी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती पोलिसपाटील युवराज माळी यांनी दिली. भडणे तलाठी आर. डी. पवार व पशुसंवर्धन आरोग्य, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. युवराज देसले यांनी पंचनामा केला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

साळवे येथील गुलाब फकिरा ठाकूर यांच्या गावशिवरातील शेतात बुधवारी रात्री बाराच्या सुमारास अवकाळी पाऊस व वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला. शेतकरी ठाकूर गुरुवारी (ता. १६) सकाळी शेतावर गेले असता घटनेची माहिती कळाली. बैल मालक ठाकूर यांनी साळवे येथील पोलिसपाटील शिवाजी पाटील यांनी माहिती दिली. त्यांनी तलाठी पवार, पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली.