दलित-आदिवासींच्या निधीचा गैरवापर 

भगवान जगदाळे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघातर्फे करण्यात आली होती. रस्ता रोको व ठिय्या आंदोलनादरम्यान गटविकास अधिकारी भावसार यांनी पाठपुरावा करण्याचे व चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघातर्फे करण्यात आली होती. रस्ता रोको व ठिय्या आंदोलनादरम्यान गटविकास अधिकारी भावसार यांनी पाठपुरावा करण्याचे व चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.13) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे.पी.खाडे, वरिष्ठ शाखा अभियंता आर.एस.चत्रे आदींसह कार्यकर्त्यांनी दलित वस्तीची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली.

दलित-आदिवासी वस्तीत चार काँक्रीट रस्त्यांपैकी प्रत्यक्ष एकही रस्ता झाला नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. स्त्री शौचालयांचे कामही झाले नसून, मंजूर झालेला हायमस्ट लॅम्प अद्यापही बसवण्यात आलेला नाही. जुन्या शौचालयांचीही बिकट अवस्था झाली असून तेथील रहिवाशांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे जैताणे शहराध्यक्ष सिद्धार्थ जगदेव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. चौकशी समितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासन पुढे नेमकी काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे साक्री तालुका विधानसभा संघटक कमलाकर मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष रविराज जाधव, सिद्धार्थ जगदेव, मुख्तार शाह, रमेश कांबळे, सागर पवार, राजेश माळचे, अश्विन वाघ, सावन बागुल, शरद पवार, विनोद ठाकरे, मांज्या ठाकरे आदींसह दलित-आदिवासी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते!

Web Title: misuse of fund which reserved for backward class and tribal