मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून मुक्ताईनगरला स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.