VIDEO : 'हे' आमदार अद्यापही कुटुंबीयांसाठी "नॉट रिचेबल' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्ताकारणाला शनिवारपासून कलाटणी मिळाली असून, त्याच पार्श्वभूमीवर कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता आहेत. त्यांचा संपर्क होत नसल्याने अखेर शनिवारी रात्री पंचवटी पोलिसात त्यांचा मुलगा हृषीकेश पवार यांच्या तक्रारीनुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली. त्यानंतरही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे कुटुंबीयांकडून वारंवार प्रयत्न केले जात होते. दुसरीकडे पक्ष कार्यालयाकडूनही त्यांचा शोध घेतला जात असताना दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ट्‌विटवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार पवार सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अद्यापही त्यांचा नाशिकमध्ये असलेल्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही.

नाशिक : कळवणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत शनिवारी (ता.23) रात्री दाखल करण्यात आली. तर रविवारी (ता. 24) दुपारनंतर आमदार पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याशी संपर्क झाल्याचे समोर आले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. मात्र अद्याप त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही. 

ट्‌विटवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रातील सत्ताकारणाला शनिवारपासून कलाटणी मिळाली असून, त्याच पार्श्वभूमीवर कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता आहेत. त्यांचा संपर्क होत नसल्याने अखेर शनिवारी रात्री पंचवटी पोलिसात त्यांचा मुलगा हृषीकेश पवार यांच्या तक्रारीनुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली. त्यानंतरही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे कुटुंबीयांकडून वारंवार प्रयत्न केले जात होते. दुसरीकडे पक्ष कार्यालयाकडूनही त्यांचा शोध घेतला जात असताना दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ट्‌विटवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार पवार सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अद्यापही त्यांचा नाशिकमध्ये असलेल्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही. आमदार पवार यांचा थेट संपर्क होत नसल्याने कुटुंबीय द्विधा मनस्थितीत असल्याचे हृषीकेश पवार यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitin Pawar is still not meet family Nashik Marathi Political News