Rohit Pawar News : ‘इंडिया’ संघटनातून देशात सत्ताबदल होईल : आमदार रोहित पवार

Rohit Pawar
Rohit Pawaresakal

Rohit Pawar News : उघड दडपशाही, हुकूमशाहीमुळे राज्यासह देशात भाजपविरोधात वातावरण आहे. त्याची जाणीव या पक्षाच्या नेत्यांना असल्याने त्यांना सत्ता जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते पक्ष आणि कुटुंब फोडत आहेत.

यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचले आहे. त्यामुळे इंडिया संघटनातून २०२४ मध्ये सत्ताबदल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार गटाचे नेते राज्यव्यापी दौरा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पवार सोमवारी (ता. ४) येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यास उपस्थित होते. ( MLA Rohit Pawar statement about change of power in country through India organization dhule news )

आमदार सुनील भुसारा, माजी आमदार जयदेव गायकवाड, विद्या चव्हाण, रविकांत वर्पे, राज राजापूरकर, विकास लवांदे, संदीप बेडसे, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, निरीक्षक उमेश पाटील, जितेंद्र मराठे, रणजित भोसले, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, उषा पाटील, शकिला बक्ष, कविता म्हेत्रे, ललित वारुडे, वाल्मीक मराठे उपस्थित होते.

आमदार पवार यांचे प्रश्‍न

आमदार पवार म्हणाले, राज्याचे राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. पैशांचा अतिरेकी वापर होत आहे. अधिवेशनात जनतेच्या प्रश्‍नांवर भाजप बोलत नाही. पालकमंत्री धुळे जिल्ह्यात कधी फिरकत नाही.

मग जनतेचे प्रश्न सुटतील कसे? रोजगारासह कापसाला चांगला दर नाही, रखडलेली शिक्षक भरती, इतर भरती प्रक्रियांसाठी हजार रुपये शुल्क आकारणी आदींसारखे प्रश्‍न सत्ताधारी भाजप का सोडवित नाही? आमदाराला मंत्री करता आले नाही, तर १५० कोटींचा निधी दिला जातो. नोकरीसाठी अर्जदार तरुणांकडून हजार रुपये का घेतले जातात? आमच्यातील स्वार्थी राजकारणी सत्तेत गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rohit Pawar
Rohit Pawar News : कर्जत-जामखेडच्या MIDCसाठी रोहित पवार एकटेच भिडले! अखेर उद्योगमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

पण कार्यकर्ते, सामान्य जनता, मराठी माणूस फुटणार नाही. दंगलीतून राजकारण आणि त्यातून सत्ता, असे भाजपचे धोरण आहे, अशी टीका आमदार पवार यांनी उपस्थित केला.

लाठीहल्ल्यामुळे सरकारने माफी मागावी

जालना येथे ८ सप्टेंबरला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला अडथळा नको म्हणून मराठा समाज आरक्षणप्रश्‍नी आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनावेळी ५० पोलिस, तर लाठीहल्ला वेळी ५०० पोलिस, असे कसे? सुरवातीला दगडफेक नाही तर लाठीहल्ला झाला. सरकार खोटे बोलत आहे.

तेथील पोलिस अधीक्षकांना निलंबित करून साध्य काय होणार? लाठीहल्ल्याचा निर्णय तर मंत्र्यांनी घेतला. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, सरकारने माफी मागावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली. आगामी निवडणुकीत या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
Rohit Pawar: फडणवीस ‘एसी’त बसून बोलू नका, परिस्थिती पाहा, राजीनामा द्या : आमदार रोहित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com