Dhule News : खंडेराव यात्रेत मोबाईल चोराला अटक; सात मोबाईल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

Dhule News : खंडेराव यात्रेत मोबाईल चोराला अटक; 7 मोबाईल जप्त

शिरपूर (जि . धुळे) : शहरातील खंडेराव महाराज यात्रेत मोबाईल (Mobile) चोरून तेथेच विकण्याचा उद्योग करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. (Mobile thief arrested in Khanderao Yatra 7 mobile phones seized dhule news)

संशयित प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला असून, त्याच्याकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले. त्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

इमरान शकील मलक (वय ३२, रा. ईदगाहनगर, शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला १९ फेब्रुवारीला शहरातील खंडेराव महाराज मंदिराजवळून अटक करण्यात आली. त्याच्याकडे चोरीचे सात मोबाईल आढळले. विशेष म्हणजे चोरी केलेल्या जागेपासून काही अंतरावरच मोबाईल विकण्याचा धंदा त्याने काढल्याचे निष्पन्न झाले.

शहरातील खंडेराव मंदिरात माघ शुद्ध पौर्णिमेपासून खंडेराव महाराजांची यात्रा भरली होती. तेथे पावभाजी विक्रीचा स्टॉल टाकलेल्या समाधान धुडकू धनगर याचा विवो कंपनीचा मोबाईल १८ फेब्रुवारीला चोरीस गेला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना तपासादरम्यान यात्रेत एकजण अगदी स्वस्तात मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरून शोधपथकाने इमरान शकील मलक (रा. ईदगाहनगर) याला यात्रेतून अटक केली.

त्याच्याकडे पावभाजीच्या दुकानावरून चोरलेल्या मोबाईलसह चोरीचे सात मोबाईल आढळले. त्यांची किंमत एकूण ३६ हजार रुपये आहे. इमरान पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, शोधपथकाचे उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, सचिन वाघ, आरिफ तडवी, गृहरक्षक दलाचे नाना अहिरे, चेतन भावसार, मिथुन पावरा, शरद पारधी, राम भिल यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Dhulemobilethief