Vidhan Sabha 2019 : महायुतीच्या मोहन सूर्यवंशींचा उमेदवारी अर्ज जल्लोषात दाखल!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

- 'रावसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

निजामपूर-जैताणे (धुळे) : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (ता.4) आपापले अर्ज दाखल केले. 

साक्री विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतर्फे शुक्रवारी (ता.4) इंजि. मोहन सूर्यवंशी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांची साक्री शहरात समर्थक आणि कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली होती. 'रावसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

यावेळी सूर्यवंशी यांच्यासमवेत पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे, भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, पोपटराव सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्या लीला सूर्यवंशी यांच्यासह भाजप-शिवसेना महायुतीचे तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

भाजप

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : मनसेचे सुहास निम्हण यांनी भरला उमेदवारी अर्ज

- 'यादीत नाव नाही, आता कसं वाटतंय?'; विद्यार्थ्यांनी काढले तावडेंना चिमटे!

- Vidhan Sabha 2019 : 'या' जिल्ह्यात भाजपची अपक्षांविरोधातच लढाई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Suryawanshi has filed his nomination from Sakri Constituency for Maharashtra assembly election 2019