Dhule : शेळ्यांसाठी मोहगावच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule latest marathi news

Dhule : शेळ्यांसाठी मोहगावच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल

वार्सा (जि. धुळे) : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार संततधार पाऊस (heavy Constant rain) सुरू असल्याने, शेळ्यांना दररोज चारण्यासाठी नेणे हे कामच आहे. मात्र पाऊस अजिबातच उघडीप देत नसल्याने मोहगाव ( ता. साक्री) येथील शेतकऱ्यांने अनोखी शक्कल लढविली आहे. (Mohgaon farmers unique technique for goats dhule Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik Flood News : पुरातील मृतांची संख्या 10; 3 मृतदेहच यंत्रणणेच्या हाती

येथील शेळीपालक शेतकरी मन्साराम गावित यांनी शेळ्यांना पावसाचे पाणी लागू नये यासाठी प्रत्येक शेळीला गोण्यांचे रेनकोट घातले आहे. शेळी पालकाने शेळ्यांना घरी पावसामुळे बांधून ठेवले तर जास्त चारा लागेल. परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रानही हिरवेगार झाले आहे. मग काहीतरी करून शेळ्या तर रानात (जंगलात) चारण्यासाठी घेऊन जाणे गरजेचे आहे. मात्र पावसामुळे ते शक्य होत नसल्याने शेळ्या चारण्यासाठी त्यांनी रिकाम्या गोण्या प्रत्येक शेळीच्या पाठिवर बांधल्या जेणेकरून शेळ्यांचा पावसापासून बचाव होवू शकेल.

हेही वाचा: Nashik : पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर

Web Title: Mohgaon Farmers Unique Technique For Goats Dhule Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..