
मोना महेश सपाट (रा. गंगाघाट, पंचवटी) असे मातेचे नाव आहे. मोना सपाट ही महिला गंगाघाटावरील फिरस्ती आहे. बुधवारी (ता. 25) त्यांना प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचदिवशी प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला होता. परंतु या बाळाचे वजन अवघे 700 ग्रॅम होते. त्यामुळे त्यास नवजात अर्भकाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने कमी वजनाच्या बाळास जन्म दिला. परंतु तीन दिवसांच्या उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या मातेने रुग्णालयातून पलायन केला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या अडचणीत भर पडली असून, बाळाच्या मातेचा शोध पंचवटी पोलिसांनी घेतला.
अशी घडली घटना....
मोना महेश सपाट (रा. गंगाघाट, पंचवटी) असे मातेचे नाव आहे. मोना सपाट ही महिला गंगाघाटावरील फिरस्ती आहे. बुधवारी (ता. 25) त्यांना प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचदिवशी प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला होता. परंतु या बाळाचे वजन अवघे 700 ग्रॅम होते. त्यामुळे त्यास नवजात अर्भकाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मुळात त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्या बाळाचा शनिवारी (ता.28) सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. ही बाब मोना सपाट यांना समजली. त्यानंतर तिने आपले मृत बाळ एसएनसीयू कक्षात जाऊन ताब्यात न घेता रुग्णालयाच्या प्रसूतीनंतरच्या कक्षातून पलायन केले. ही बाब कक्षातील परिचारिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरक्षारक्षकामार्फत तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे यासंदर्भात विभागाच्या प्रमुखांकडे माहिती दिल्यानंतर मोना सपाट हिने पोबारा केल्याचे समोर आले.
वाचा तर खरी-मरणाने केली सुटका, पण मोक्षासाठी छळ
माता मिळत नाही तोपर्यंत मृत बाळ शवगारात..
दरम्यान, मृत बाळाचे शवविच्छेदन केले जात नाही. परंतु त्यासंदर्भातील प्रशासकीय बाब पूर्ण करण्यासाठी माता असणे आवश्यक आहे. ती नसल्याने रुग्णालय प्रशासनाची अडचण झाली. अखेरीस याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून पंचवटी पोलिस ठाण्यास लेखी पत्र देण्यात आले असून, त्यानुसार संबंधित महिलेस शोधून आणून तिच्या ताब्यात मृत बाळ देत पुढील कार्यवाही करण्याचे त्यात म्हटले आहे. माता मिळत नाही तोपर्यंत मृत बाळ शवगारात ठेवण्यात आले आहे.
नक्की पहा > त्याने कागदावर काढले अपघाताचे चित्र आणि पुढे जे काही घडले थरकाप उडविणारे...