Vishnu Gosavi
sakal
मुक्ताईनगर: शहरातील हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग भागात मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी उघडकीस आली. तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याचे समोर आले. प्रेमसंबंधातून हा खून केला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.