मुक्ताईनगर- गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात चालकासह सात प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने सुसाट धावत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अवैध वाहतुकीवर लगाम घालण्याची मागणी होत आहे.