Latest Marathi News | वैयक्तिक शौचालयांसाठी महापालिकेकडे 4 कोटी पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : वैयक्तिक शौचालयांसाठी महापालिकेकडे 4 कोटी पडून

धुळे : ठेकेदारांमार्फत सार्वजनिक शौचालय चालविण्याची पद्धत राज्यात कुठेच नाही. धुळ्यातच ही पद्धत असून, येथे ठेकेदारांची मुजोरी झाली आहे, असे म्हणत सार्वजनिक शौचालये बंदच व्हायला हवीत.

त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी सार्वजनिक शौचालयांसाठी आग्रह धरू नये. वैयक्तिक शौचालयांचा पर्याय उपलब्ध असून त्यासाठी महापालिकेकडे चार कोटी रुपये पडून आहेत अशी माहिती उपायुक्तांनी स्थायी समिती सभेत दिली. (Municipal corporation 4 crore pending for individual toilets Deputy Commissioner gave information in Standing Committee meeting dhule news)

हेही वाचा: Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा Action Plan

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंगळवारी (ता.२७) काही नगरसेवकांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न मांडला. सदस्य नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी आदींनी हा प्रश्‍न मांडला. त्याअनुषंगाने उपायुक्त विजय सनेर यांनी कार्यवाहीची माहिती दिली. श्री. सनेर म्हणाले, मुळातच सार्वजनिक शौचालये बंद करणे असाच शासकीय योजनांचा उद्देश आहे.

राज्यात कोणत्याही महापालिकेकडून सार्वजनिक शौचालयांवर पैसे खर्च केले जात नाहीत. बीओटी तत्त्वावर किंवा एनजीओच्या माध्यमातून ही शौचालये चालविली जातात. धुळ्यातच ठेकेदारामार्फत ही शौचालये चालविली जातात. धुळ्यातच ही ठेकेदारी पद्धत आहे. ठेकेदारांची येथे मुजोरी असल्याचा उल्लेखही श्री. सनेर यांनी केला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

हेही वाचा: Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

त्यामुळे सार्वजनिक शौचालयांसाठी पदाधिकारी, नगरसेवकांनी आग्रह धरू नये अशी विनंती असेल असे श्री. सनेर म्हणाले. दरम्यान, शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेबाबत व त्याअनुषंगाने काय करता करता येईल याबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेथे आज गरज आहे, तेथे दुरुस्ती करण्याची मागणी सदस्य श्री. बोरसे यांनी केली.

वैयक्तिक शौचालयांसाठी निधी

सार्वजनिक शौचालयांऐवजी वैयक्तिक शौचालयांना शासनाचेही प्राधान्य आहे. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी महापालिकेकडे चार कोटी रुपये पडून आहेत. यातून तीन-चार हजार वैयक्तिक शौचालये आपण बांधू शकतो असे उपायुक्त श्री. सनेर म्हणाले. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांसाठी आग्रह धरण्याचा श्री. सनेर यांचा रोख होता. दरम्यान, वैयक्तिक शौचालये सेप्टिक टँक बांधण्यासाठी ज्या ठिकाणी जागेच्या समस्या आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या जागांवर सेप्टिक टँक बांधावेत असे सदस्य श्री. बोरसे म्हणाले. सदस्या नाजियाबानो पठाण यांनी देवपूर भागात नाल्यात शौचालयांचे आऊटलेट सोडल्याचा मुद्दा पुन्हा मांडून ते बंद करण्याची मागणी केली.

हेही वाचा: Jalgaon News : कापूस मार्केट ‘क्रॅश’ अन् भावात घसरण सुरूच! CCIच्या केंद्रावरही कापूस येईना

मरने दो इनको

असं ठरवलंय का?

सभेत काँग्रेसचे सदस्य साबीर शेठ यांनी अल्पसंख्याक प्रभागातील एलईडी पथदीपांचा प्रश्‍न मांडला. बारा महिने झाले हा प्रश्‍न मार्गी लागत नाही. केवळ बहाणा सांगितला जातो. जुने पथदीप तरी सुरू करा अशी मागणी त्यांनी केली. मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. जलवाहिन्यांचे एका ठिकाणी लिकेज काढले की दुसऱ्या ठिकाणी लिकेज होत असल्याचा तसेच, मनपा भूखंडांवर इतर लोक लाखो रुपये भाडे कमावत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या सर्व प्रश्‍नांवर काहीही कार्यवाही होत नाही. अल्पसंख्याक भागासाठी ‘मरने दो इनको’ असे धोरण ठरवलेय का असा सवालही साबीर शेठ यांनी केला.

हेही वाचा: Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा Action Plan