Dhule Municipality News : स्मारके, धार्मिक स्थळांजवळ आता ‘नो चमकोगिरी’; महापालिका महासभेत निर्णय

शहरातील महापुरुषांची स्मारके, धार्मिक स्थळे, महापालिका इमारत यासह इतर काही ठिकाणी शंभर मीटर परिसरात बॅनरबाजीला प्रतिबंध घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
Dhule Muncipal corporation
Dhule Muncipal corporationSakal

Dhule Municipality News : शहरातील महापुरुषांची स्मारके, धार्मिक स्थळे, महापालिका इमारत यासह इतर काही ठिकाणी शंभर मीटर परिसरात बॅनरबाजीला प्रतिबंध घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अल्प मुदतीच्या बॅनर, होर्डिंगसाठी शहराच्या विविध भागांतील जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत, तर दीर्घ मुदतीच्या बॅनर, होर्डिंगसाठी २२२ जागांचे निश्‍चितीकरण झाले आहे, त्यामुळे इतर ठिकाणचे दीर्घ मुदतीचे बॅनर, होर्डिंग निष्कासित करण्यात येणार आहेत. (Municipal Corporation has decided to ban display of banners within 100 meter radius of municipal building and some other places dhule news)

शहरात अनधिकृत बॅनरबाजीचे पीक बाराही महिने पाहायला मिळते. कोणत्या ठिकाणी बॅनर, होर्डिंग, स्टिकर्स लावावेत, कोणत्या ठिकाणी ते लावू नयेत यालाही काही बंधन नसल्याचे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बॅनरबाजीने शहराचे विद्रूपीकरण पाहायला मिळते. यावर लगाम घालण्यासाठी महापालिकेकडून अनेकदा कारवाया करण्यात आल्या, मात्र महापालिकेच्या इतर अनेक कारवायांसारख्याच या कारवायादेखील थातुरमातुर आणि दिखाऊ झाल्या.

भाजपच्या महापालिकेतील गेल्या पाच वर्षांतील सत्ताकाळात अनेकदा काही पदाधिकारी, नगरसेवकांकडून अशा बॅनरबाजीविरोधात आवाज उठविला गेला, प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाल्याचे दिसले नाही. विशेष म्हणजे ज्या महापालिकेकडून बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी परवानगी घेण्याची गरज असते त्याच महापालिकेच्या नव्या, जुन्या इमारतीला लागून, इमारतींसमोर असे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळते.

Dhule Muncipal corporation
Dhule Municipality News : तक्रारी करून दमले... शेवटी कंठ दाटला; स्मशानभूमी दुरवस्थेचा विषय

दरम्यान, आता प्रशासकराज सुरू झाल्यानंतर मागील महासभेत जाहिरात परवाना शुल्क आकारणीसह जाहिराती लावण्यासाठी जागांचे निश्‍चितीकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जनहित याचिका व महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील अधिसूचनेनुसार महापालिकेने जागांचे निश्‍चितीकरण केले आहे.

या ठिकाणी प्रतिबंध

मनपा नवीन प्रशासकीय इमारत, मनपा जुनी प्रशासकीय इमारत, शहरातील महापुरुषांची स्मारके, शहर हद्दीतील मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे, तसेच कराचीवाला खुंट, बॉम्बे लॉज चौक, कालिका माता चौक, पांझरा नदीकिनारी, जुने सिव्हिल हॉस्पिटल, बाफना हायस्कूल चौक या सर्व ठिकाणांच्या शंभर मीटर परिसरात बॅनरबाजीला प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणी आता बॅनर, होर्डिंग, पोस्टर, स्टिकर लावण्यास प्रतिबंध असेल.

Dhule Muncipal corporation
Dhule Municipality News: वाढीव मालमत्ता करवसुलीला विरोध; 30 टक्के वाटा देणार कसा? महापालिकेपुढे संकट!

दीर्घ मुदतीसाठी २२२ जागा

महापालिकेच्या महासभेने अल्प मुदतीचे बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी महापालिका हद्दीतील जागा निश्‍चित केल्या आहेत. याशिवाय दीर्घ मुदतीच्या बॅनर, होर्डिंगसाठी २२२ जागांचे निश्‍चितीकरण करण्यात आले आहे. या २२२ जागा वगळता इतर अनेक जागांवर बेकायदा होर्डिंगबाजी झाली आहे, ते निष्कासित करण्यात येणार आहेत.

सद्यःस्थितीत सुमारे साडेचारशे ते पाचशे ठिकाणी होर्डिंग लागले आहेत. त्यामुळे २२२ ठिकाणे वगळता इतर बेकायदा होर्डिंग निष्कासित होतील. मंजूर ठराव संबंधित विभागाला प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Dhule Muncipal corporation
Dhule Municipality News : योजनांचा हिस्सा भरण्यासाठी मनपा कर्ज घेणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com