Dhule News : अनधिकृत बॅनरप्रश्‍नी अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

धुळे : महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी अखेर महापालिकेने पुढाकार घेतला. याबाबत ज्या-ज्या ठिकाणी असे अनधिकृत बॅनर, फलक दिसतील त्यांचे सर्वेक्षण करून ते निष्कासित करण्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच एकूणच कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. (Municipal Corporation has taken initiative to curb unauthorized display of banners in municipal sector dhule news)

धुळे महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक, खासगी ठिकाणावर जाहिरात, बॅनर, फलक लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांनी महापालिकेची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश प्रसंगी परवानगी न घेता अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात येतात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होते.

याबाबत उच्च न्यायालयाने जनहित याचिका तसेच सु-मोटो अवमान याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिंग, पोस्टर्स या संदर्भात अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व महापालिका, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी अनधिकृत जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्स आदी निष्कासनाच्या अनुषंगाने वेळोवेळी कारवाई करावी, स्पेशल ड्राइव्ह राबवावा, असे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने धुळे महापालिकेतर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत गुरुवारी (ता. ९) अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात महापालिका, पोलिस, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dhule Municipal Corporation
Girish Mahajan : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची ‘मर्यादा’ वाढणार! मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

महापालिकेच्या करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र माईनकर, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, जाहिरात विभागप्रमुख सुक्राम राऊत, बाजार विभागप्रमुख किशोर सुडके, सर्व स्वच्छता निरीक्षक, जाहिरात ठेकेदार आदी उपस्थित होते.

गुन्हा दाखल करा

स्वच्छता निरीक्षकांना आपापल्या भागातील अनधिकृत बॅनर, होर्डिंगचे सर्वेक्षण करून तसा अहवाल जाहिरात विभागाला सादर करावा, जाहिरात विभागाने आवश्‍यक कार्यवाहीनंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अहवाल सादर करावा व त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत बॅनर निष्कासित करावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त कापडणीस यांनी दिला.

तसेच अनधिकृत बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर आयुक्तांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही श्री. कापडणीस यांनी दिले. बाजार विभागप्रमुख श्री. सुडके यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. श्रीमती शिरसाट यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Dhule Municipal Corporation
Nashik Crime : मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न! अनिवासी भारतीय दांपत्यासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

क्यूआर कोड आवश्‍यक

जाहिरात फलक लावण्यासाठी http://nagarkaryavali.com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा किंवा धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीतील जाहिरात विभागात अर्ज, शुल्क भरून क्यूआर कोडसह परवाना घ्यावा. अर्जदाराने सदर क्यूआर कोड जाहिरात फलकावर छापणे बंधनकारक आहे.

जाहिरातीवर क्यूआर कोड नसल्यास कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, धुळे महापालिका क्षेत्रात निश्‍चित केलेल्या २२३ ठिकाणावरील जाहिरात शुल्क वसुलीचे काम व शहरातील सर्व अनधिकृत पोस्टर बॅनर काढण्याचे काम मार्केट मूव्हर्स या संस्थेला दिले आहे. तथापि, जाहिरात फलक परवानगीचे काम मात्र कोणत्याही संस्थेला दिलेले नाही.

नागरिकांना तक्रारीचे आवाहन

दरम्यान, महापालिका क्षेत्रात सार्वजनिक, खासगी ठिकाणांवर जाहिरात जाहिरात, बॅनर, फलक बेकायदेशीरपणे लावू नये. बेकायदेशीरपणे बॅनर, फलक आढळून आल्यास नागरिकांनी धुळे महापालिकेच्या १८००२३३३०१० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ७८७५२००९२५ या क्रमांकावर व्हॉट्सॲप, एसएमएसद्वारे तक्रार दाखल करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : राहुल भोई खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा, भोई समाजाचे निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com