Municipal Corporation issued notice to encroachers on Sushi Nala to remove their encroachment within 3 days
Municipal Corporation issued notice to encroachers on Sushi Nala to remove their encroachment within 3 daysesakal

Dhule News : धुळ्यातील अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा; 2 दिवसांची मुदत

Dhule News : शहरातील देवपूर भागातील सुशी नाल्यावरील अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे तीन दिवसात काढण्याबाबत महापालिकेने नोटीस बजावली आहे. (Municipal Corporation issued notice to encroachers on Sushi Nala to remove their encroachment within 3 days dhule news)

याशिवाय शहरातील खड्डीपट्टी भागातील अतिक्रमणधारकांनाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे मंगळवारी (ता.२५) नोटिसा बजावण्यात आल्या असून अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात या भागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील अतिक्रमण निर्मूलनाचा विषय पुन्हा एकदा महापालिकेने अजेंड्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अर्थात पावसाळ्यापूर्वी विशेषतः नाल्याच्या काठावरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता दरवर्षी होते. मात्र, मागील वर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागल्याने यंदा याबाबत काय कार्यवाही होते याकडे लक्ष आहे.

याच अनुषंगाने महापालिकेने देवपूर भागातील सुशी नाल्यावरील अतिक्रमणधारकांना आपापली अतिक्रमणे तीन दिवसात काढण्याची नोटीस बजावली आहे. देवपूर भागातील प्रभाग क्रमांक-३ मध्ये सुशी नाल्याच्या प्रवाहात व नाल्याच्या रुंदीत रहिवासी अतिक्रमण आहे. ते काढण्याबाबत महापालिकेतर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Municipal Corporation issued notice to encroachers on Sushi Nala to remove their encroachment within 3 days
Jal Jeevan Mission: जिल्ह्यात 600 योजना पूर्ण करण्यासाठी 30 जून डेडलाईन; जलजीवन मिशन योजना आढावा बैठकीत सूचना

गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे नाल्यास प्रचंड पूर आला होता व नाल्यात केलेल्या अतिक्रमणांमुळे पुराचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरांत घुसून प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे येत्या तीन दिवसाच्या आत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे असे महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे.

स्वखर्चाने अतिक्रमण काढा

नाल्यात पावसाच्या पाण्याला अडथळा ठरून परिसरातील व अतिक्रमणधारकांचे स्वतःचे नुकसान (जीवित व वित्तहानी) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी तत्काळ आपली अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत सदर अतिक्रमणे काढण्यात येतील व होणाऱ्या नुकसानीस अतिक्रमणधारक व्यक्तिशः जबाबदार राहतील असे महापालिकेने म्हटले आहे.

खडीपट्टी भागातही नोटिसा

शहरातील खडीपट्टी भागात बडेमियाँ हकिमियाँ बिल्डिंग ते पूर्व हुडको नाल्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. रस्त्याच्या जागेवर तसेच काही खासगी जागांवर ही अतिक्रमणे आहेत. याबाबत खासगी व्यक्तींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संबंधित खासगी व्यक्तींच्या बाजूने निकाल दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी महापालिकेने ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली होती.

दरम्यानच्या काळात सण-उत्सव आल्याने या कारवाईला ब्रेक लागला होता. दरम्यान, आता पुन्हा महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २५) या भागातील ८०-८५ अतिक्रमणधारकांना मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या. दोन दिवसात संबंधितांना आपली अतिक्रमणे हटविण्यास सांगितले आहे. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी पोलिसांना पत्रही दिल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव यांनी सांगितले.

Municipal Corporation issued notice to encroachers on Sushi Nala to remove their encroachment within 3 days
Accident Insurance Scheme : जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांसाठी 36 लाख; सुधारणेसह नवीन नामकरणाने लाभाचे वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com