
महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून परवानगी घेण्यात येत नाही. ही बाब महानगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन करणारी आहे.
धुळे ः दुकानांसह शहरात विविध ठिकाणी बॅनर, फ्लेक्स व इतर विविध स्वरूपात फलक लावले जातात. त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांनी रीतसर महापालिकेला शुल्क अदा करावे. अन्यथा, महापालिकेकडून कारवाईसह खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिला.
वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
धुळे शहरात अनेक टिव्ही शोरुम, मोबाईल शोरूम, जेन्टस व लेडिज गारमेंट्स व विविध दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिक ठिकठिकाणी तसेच दुकानांवर मोठे बॅनर, प्लेक्स लावतात. त्यात विद्युत रोषणाईच्या करतात. तसेच काही नागरिक धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस व इतर प्रकारचे बॅनर लावत असतात. त्यासाठी महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून परवानगी घेण्यात येत नाही. ही बाब महानगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन करणारी व मालमत्ता विद्रुपीकरणअंतर्गत शहरास हानिकारक व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारी आहे.
आवश्य वाचा- मस्त चिकन खा.. आणि तंदुरुस्त रहा !
त्यामुळे दहा दिवसाच्या आत असले प्रकार नियमानुकूल न केल्यास कुठलीही सूचना न देता बॅनर, फलक, फ्लेक्स काढण्याची कार्यवाही केली जाईल व यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा आयुक्त शेख यांनी दिला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे