Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष हा प्रत्यक्षात भाजपचीच ‘बी-टीम’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री, आमदार अनिल पाटील यांनी केला. एमआयएमला पक्षाला दिलेले मत म्हणजे थेट भाजपला दिलेले मत असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी भाजपच्या निवडणूक रणनीतीवर जोरदार टीका केली. एमआयएमच्या उमेदवारांसाठी निधी पुरवठ्यापासून प्रचार व्यवस्थापनापर्यंत सर्व व्यवस्था भाजपकडूनच करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.