Dhule Municipal Election
sakal
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर प्रभाग दोनमध्ये राजकीय समीकरणे कमालीची रंगतदार झाली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे असल्याने या प्रभागात ‘मैत्रीपूर्ण’सह थेट लढतीची रंगत पाहायला मिळत आहे. प्रस्थापित चेहऱ्यांबरोबरच उच्चशिक्षितांनी रिंगणात उडी घेतल्याने मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याची उत्कंठा असेल. प्रभाग दोनमध्ये प्रस्थापितांच्या अनुभवाची कसोटी, तर नवोदित आणि अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवितात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.